15 December 2024 6:01 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत - NSE: NBCC SBI Share Price | SBI बँक सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: SBIN Adani Energy Solutions Share Price | अदानी एनर्जी सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIENSOL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, कमाईची मोठी संधी Redmi Note 14 Series | रेडमी Note 14 सिरीजची पहिली सेल; रेडमी Note 14 स्मार्टफोन फीचर्स आणि ऑफर जाणून घ्या
x

आज ४ वाजता देवेंद्र फडणवीस यांची महत्वाची पत्रकार परिषद

Devendra Fadnavis, press conference

मुंबई, २६ मे: महाराष्ट्रात एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. तर दुसरीकडे राजकीय हालचालींना वेग आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी विरोधकांकडून होत असतानाच राज्य सरकार अस्थिर करण्याचे विरोधकांचे प्रयत्न सुरू असल्याचा दावा सत्ताधाऱ्यांकडून करण्यात येत आहे. त्यातच आता विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद बोलावली आहे. आज दुपारी ४ वाजता फडणवीस पत्रकारांशी संवाद साधणार असून संपूर्ण राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ते काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, भाजपाने सरकारविरोधात पुकारलेले आंदोलन, राजभवनावर भेटीसाठी लागलेल्या नेत्यांच्या रांगा आणि नारायण राणेंनी केलेली राष्ट्रपती राजवटीची मागणी. या सर्व वेगवान घडामोडींमुळे राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्क लढवले जात आहेत.

दरम्यानच्या काळात सत्तास्थापनेच्या वेळीही मातोश्रीची पायरी न चढलेल्या शरद पवार यांनी सोमवारी संध्याकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची मातोश्री बंगल्यावर भेट घेतली. त्यामुळेच राजकीय चर्चांना सोमवार संध्याकाळपासूनच उधाण आलं आहे. महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा राष्ट्रपती राजवट लागणार का यासंदर्भात चर्चा सुरु झाल्या आहेत.

 

News English Summary: Leader of Opposition in the Assembly Devendra Fadnavis has called a press conference. Fadnavis will be interacting with journalists at 4 pm today.

News English Title: Leader of Opposition in the Assembly Devendra Fadnavis has called a press conference News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x