1 May 2025 5:04 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 01 मे 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 01 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Share Price | जेएम फायनान्शियल फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्स टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RELIANCE AWL Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत; 58 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: AWL IRFC Share Price | पीएसयू शेअर्सबाबत महत्वाचे संकेत, मोठी झेप घेणार, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC Jio Finance Share Price | हा शेअर लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा, संयम देईल मोठा परतावा - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप शेअर्सबाबत महत्वाची अपडेट, फायदा देणारी अपडेट आली - NSE: TATATECH
x

केंद्र सरकारची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न – देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis, MahaVikas Aghadi

मुंबई, २६ मे: कोरोनाच्या काळात केंद्र सरकार महाराष्ट्राला सर्वतोपरी मदत करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र असं असताना महाराष्ट्रासोबत अन्याय केला जात असल्याची भूमिका तयार केली जात आहे. खोटा प्रचार करून केंद्र सरकराची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पत्रकार परिषदेत केंद्र सरकारचू भूमिका मांडत सत्ताधाऱ्यांना टोला लगावला आहे.

यावेळी पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारने महाराष्ट्रासाठी कशा प्रकारे मदत केली व करतंय याचा लेखाजोखा मांडला. महाराष्ट्रातून ६०० ट्रेन्स सोडण्यात आल्या असून श्रमिक रेल्वेसाठी ३०० कोटी केंद्राने दिले आहेत. तर मजुरांच्या छावण्यांसाठी १ हजार ६११ कोटींचा निधी देण्यात आला आहे. १०लाख पीपीई आणि १६ लाख एन ९५ मास्क यांचा पुरवठा राज्याला करण्यात आला आहे. शिवाय शेतीसाठी ९ हजार कोटींचा निधी दिला आहे. तसंच राज्याला एप्रिल आणि मे महिन्याचा आगाऊ निधी देण्यात आला आहे. गरीब कल्याण पॅकेजच्या अंतर्गत १७५० कोटींचा गहू, २६२० कोटींचा तांदूळ, १०० कोटींची डाळ देण्यात आलं आहे. यासह जनधन योजनेचे १३०८ आणि उज्ज्वला अंतर्गत १६२५ कोटी देण्यात आले असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली आहे.

केंद्र सरकारने GDPच्या ५ टक्के कर्ज घेता येईल असा निर्णय घेतला. यामुळे राज्याला एक लाख ६० हजार कोटी कर्ज घेता येऊ शकतं. राज्य सरकारने बोल्ड पावले उचलली पाहिजेत, असंही फडणवीस म्हणाले.

  • केंद्र सरकारने काय काय केलं?
  • महाराष्ट्रातून ६०० ट्रेन्स सोडल्या
  • श्रमिक रेल्वेसाठी ३०० कोटी दिले
  • मजुरांच्या छावण्यांसाठी १ हजार ६११ कोटींचा निधी दिला
  • पीपीई आणि एन ९५ मास्क यांचा पुरवठा केला
  • शेतीसाठी ९ हजार कोटींचा निधी दिला
  • एप्रिल आणि मे महिन्याचा निधी आगाऊ दिला
  • गरीब कल्याण पॅकेजच्या अंतर्गत १७५० कोटींचा गहू, २६२० कोटींचा तांदूळ, १०० कोटींची डाळ दिली गेली
  • जनधन योजनेचे १३०८ कोटी दिले गेले
  • उज्ज्वला अंतर्गत १६२५ कोटी

 

News English Summary: During the Corona period, the Central Government is trying its best to help Maharashtra. But in such a situation, the role is being created that injustice is being done to Maharashtra. Former Chief Minister Devendra Fadnavis has accused the Mahavikas Aghadi government of trying to tarnish the image of the Center by spreading false propaganda.

News English Title: Former Chief Minister Devendra Fadnavis has accused the Mahavikas Aghadi government News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या