23 November 2024 6:36 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

धक्कादायक! पुण्यात डेअरी मालक व ११ कर्मचाऱ्यांना कोरोना, ग्राहकांचा शोध सुरू

Pune Hadapsar Dairy, Owner, 11 Employees, Covid 19

हडपसर, २९ मे : पुणे शहरात मागील काही दिवसात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्याच दरम्यान हडपसर भागातील प्रसिद्ध डेअरी मालकासह ११ कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत हडपसर सहायक आयुक्त कार्यालयाच्या डॉ. स्नेहल काळे यांच्याशी संवाद साधला असता त्या म्हणाल्या, हडपसर भागातील एका डेअरीच्या मालकाला कोरोनाची करोनाचा संसर्ग झाल्याचे तपासणी नंतर स्पष्ट झाले. त्यामुळे यानंतर संबधित व्यक्तीच्या दुकानातील इतर कर्मचार्‍यांचीही कोरोना तपासणी केली गेली, तर यामध्ये ते देखील कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले. सध्या या सर्वांवर उपचार सुरू आहेत, सर्वांची प्रकृती ठीक आहे. आता त्यांच्या डेअरीमधून ज्यांनी वस्तूचे खरेदी केली आहे. त्या ग्राहकांचा शोध घेण्यात येत असून त्यांची तपासणी करण्यात येत असल्याचेही सांगण्यात आले आहे.

दरम्यान, देशात महाराष्ट्राला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेला असून राज्यात काल दिवभरात २ हजार ५९८ नव्या रुग्णांची भर पडली. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता ५९ हजार ५४६ वर पोहोचली आहे. तर काल दिवसभरात ८५ कोरोना रुग्णांनी जीव गमावल्याने राज्यातील कोरोनाबळींची संख्या १ हजार ९८२ वर पोहोचली आहे.

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत काल एका दिवसात १४६७ नव्या रुग्णांची भर पडली. त्यामुळे एकट्या मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या ३५ हजार ४८५ वर पोहोचली आहे. तर काल दिवसभरात ३८ रुग्णांचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींची संख्या ११३५ वर पोहोचली आहे. मुंबईपाठोपाठ पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय. काल दिवसभरात ३६९ पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाल्याने पुण्यातील कोरोनाबाधितांचा आकडा आता ७ हजार ०१२ वर पोहोचला आहे. तर एका दिवसात १० जणांनी जीव गमावल्याने कोरोनाबळींची संख्या ३१० वर गेली आहे.

 

News English Summary: The number of coronary artery disease patients in Pune has been increasing in the last few days. Meanwhile, shocking information has come to light that 11 employees, including a well-known dairy owner from Hadapsar area, have contracted corona. This has created a stir in the area.

News English Title: Pune Hadapsar Dairy Owner Including 11 Employees Are Corona Positive News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x