मोदीजी हे पत्र देखील एकदा नक्की वाचाच; प्रियंका गांधींची मोदींना विनंती
नवी दिल्ली, ३० मे: उत्तर प्रदेशातील भानू गुप्ता नावाच्या एका व्यक्तीनं ट्रेनसमोर येऊन आत्महत्या केली. त्यानं त्यापूर्वी एक भावूक करणारं आणि आपल्या व्यथा मांडणारं पत्र लिहिलं होतं. तसंच त्यानं आपण आत्महत्या का करत आहोत हेदेखील सांगितलं होतं. दरम्यान, काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी हे पत्र शेअर करत ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जरूर वाचावं अशी विनंती त्यांनी केली आहे.
“उत्तर प्रदेशातील भानू गुप्ता यांनी ट्रेनसमोर येऊन आत्महत्या केली ही अतिशय दु:खद घटना आहे. त्यांच काम बंद बंद झालं होतं. तसंच त्यांना आपल्या आईचे उपचारदेखील करायचे होते. सरकारकडून केवळ रेशन मिळालं होतं. परंतु आणखीही काही गोष्टी आवश्यक असतात त्या खरेदी कराव्या लागतात आणि काही गरजाही असतात असं पत्रात त्यांनी म्हटलं आहे.” असं प्रियंका गांधी यांनी म्हटलं आहे. त्यांनी यासंबंधी एक ट्विट केलं आहे. “हे पत्र कदाचित वर्षपूर्तीच्या पत्राप्रमाणे गाजावाजा करत तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही. परंतु एका हे पत्र तुम्ही वाचाच. भारतात आजही अनेक जण अशाच परिस्थितीचा सामना करत आहेत,” असंही त्यांनी नमूद केलं आहे.
..ये पत्र शायद आज एक साल के जश्न वाले पत्र की तरह ‘गाजे बाजे के साथ’ आपके पास न पहुंचे। लेकिन इसको पढ़िए जरूर।
हिन्दुस्तान में बहुत सारे लोग आज इसी तरह कष्ट में हैं। 2/2
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) May 30, 2020
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळाला आज ३० मे रोजी एक वर्ष पूर्ण झालं आहे. या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींनी जनतेला उद्देशून एक पत्र लिहलं आहे. दरवेळेस पंतप्रधान मोदी व्हिडिओच्या माध्यमातून जनतेला संबोधित करतात. मात्र आज खास दिनानिमित्त मोदींनी जनतेला पत्र लिहलं आहे. या पत्रात त्यांनी आपल्या सरकारमध्ये घेण्यात आलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयांचा उल्लेख केला आहे.
कलम ३७०, सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईक, ट्रिपल तलाक, नागररिकत्व सुधारणा कायदा इत्यादी महत्त्वाचे निर्णय मोदी सरकारच्या कार्यकाळात घेण्यात आले आहेत. या ऐतिहासिक निर्णयांमध्ये भारताच्या विकास यात्रेला गती मिळाली असून लोकांच्या अपेक्षा पूर्ण केल्या असल्याचं मोदींनी पत्रात म्हटलं आहे. तसंच अनेक दशकानंतर सलग दुसऱ्यांदा बहुमताने जनतेने भाजपला निवडणून दिलेल्या संधीबद्दल मोदींनी जनतेचे आभार देखील मानले आहेत.
News English Summary: A man named Bhanu Gupta from Uttar Pradesh committed suicide in front of a train. He had earlier written a sentimental letter expressing his grief. Meanwhile, Congress leader Priyanka Gandhi shared the letter and urged Prime Minister Narendra Modi to read it.
News English Title: Congress leader Priyanka Gandhi says Prime Minister Narendra Modi should read this letter once man suicides News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार