चीनच्या लष्कराकडून तैवानला थेट युद्धाची धमकी
बीजिंग, ३० मे: एकीकडे कोरोना व्हायरस जागतीक महामारी बनला आहे. यामुळे जगातील सर्वच देश चीनला लक्ष्य करत आहेत. काही दिवसांपूर्वी, युरोपीय युनियनने कोरोना व्हायरसच्या उत्पत्तीची चौकशी व्हावी, अशी मागणी करणारा प्रस्ताव डब्ल्यूएचओच्या बैठकीत मांडला होता. त्यावेळी चीनने या प्रस्तावाला कडाडून विरोध केला. मात्र, जगाचा दबाव वाढल्यानंतर चीनचे पंतप्रधान ली केकियांग आणि परराष्ट्रमंत्री वांग यी यांनी या चौकशीला समर्थन असल्याचे म्हटले होते.
दुसरीकडे तैवानला स्वतंत्र होण्यापासून आम्हाला रोखता आले नाही, तर चीन थेट हल्ला करेल असा इशारा चीनच्या सेंट्रल मिलिट्री कमिशनचे सदस्य आणि जॉईंट स्टाफ विभागाचे प्रमुख ली झुओचेंग यांनी दिला आहे. ली झुओचेंग हे चिनी सैन्यात वरिष्ठ जनरल पदावर आहेत. चीनमध्ये इतक्या वरिष्ठ पदावरील व्यक्तीने असे विधान करणे अत्यंत दुर्मिळ बाब आहे. बीजींगच्या ग्रेट हॉल ऑफ द पब्लिक येथे शुक्रवारी ली झुओचेंग यांनी हे आक्रमक विधान केले.
“शांततेने एकीकरणाचे मार्ग बंद झाले, तर चीनचे सैन्य संपूर्ण देशाला सोबत घेऊन बंडखोरांवर कारवाई करेल” असे ली झुओचेंग म्हणाले. “सैन्याचा वापर न करण्याचा आम्ही कुठलाही शब्द दिलेला नाही. तैवानमध्ये परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आम्ही हा पर्याय राखून ठेवला आहे” असे ली झुओचेंग यांनी सांगितले.
News English Summary: Li Zhuocheng, a member of China’s Central Military Commission and head of the Joint Staff Division, warned that China would launch a direct attack if it could not prevent Taiwan from becoming independent. Li Zhuocheng is a senior general in the Chinese military.
News English Title: Chinese Army General Warn Taiwan Can Use Force News latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News