22 November 2024 6:30 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

केरळवरून मुंबईत ५० डॉक्टर्स आणि नर्सेसचं पथक दाखल

Kerala, Maharashtra, Doctors and Nurses

मुंबई, १ जून: राज्यातील काही भागात करोनाची परिस्थिती अजूनही नियंत्रणात आलेली नसल्याचं चित्र आहे. राज्यातील एकूण रुग्णांची संख्या आणि रुग्णालयातून सुटी देण्यात आलेल्या रुग्णांविषयीची माहिती दररोज राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे ट्विटरवरून देतात. दिवसेंदिवस आकडेवारीत वाढ होतं असल्याचं समोर आलं आहे आणि त्यात पावसाळा तोंडावर आल्यामुळे सरकार वैद्यकीय सेवांच्या बाबतीतही कात्रीत अडकलं आहे.

राज्यातील कोरोना परिस्थिती हाताळण्यासाठी केरळ सरकारकडे वैदकीय मदत मागितली होती. राज्य सरकारने केरळकडे १५० डॉक्टर आणि परिचारिका पुरवण्याची मागणी केली होती. वैद्यकीय शिक्षण विभागाकडून या संदर्भात पत्र पाठवण्यात आलं होतं. या पत्राला सकारात्मक प्रतिसाद देत केरळ सरकारने वैद्यकीय मदत पुरवण्याची तयारी दर्शवली होती.

त्यानुसार कोरोनाच्या लढ्यात महाराष्ट्रातल्या डॉक्टरांना आता केरळमधल्या डॉक्टर्स आणि नर्सेसची मदत होणार आहे. सरकारच्या विनंती नंतर केरळने १०० जणांची एक टीम महाराष्ट्रात पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ५० जणांची पहिली टीम मुंबईत पोहचली आहे. हे पथक सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये पोहोचलं असल्याची माहिती केरळचे आरोग्यमंत्री थॉमस इसाक यांनी दिलीय. दुसऱ्या ५० डॉक्टर्स आणि नर्सेसचं पथकही लवकरच मुंबईत दाखल होणार होणार आहे असल्याची माहिती थॉमस इसाक यांनी दिली.

 

News English Summary: Doctors in Maharashtra will now be assisted by doctors and nurses in Kerala in the fight against corona. Following the government’s request, Kerala has decided to send a team of 100 people to Maharashtra. Accordingly, the first team of 50 people has reached Mumbai.

News English Title: Covid 19 100 members medical team of doctors and nurses from Kerala state to Maharashtra News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x