22 November 2024 6:50 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्ष ट्विटर सेलमधील ८ पोलिस कोरोना पॉझिटिव्ह

Mumbai Police, Covid 19

मुंबई, १ जून: महाराष्ट्रात कोरोनाचे थैमान सुरूच आहे. रविवारी दिवसभरात २ हजार ४८७ नव्या रुग्णांची भर पडल्याने राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता ६७ हजार ६५५ वर पोहोचली आहे. तर काल दिवसभरात ८९ रुग्णांचा मृत्यू झाला असून राज्यातील कोरोनाबळींची संख्या २ हजार २८६ इतकी झाली आहे.

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत काल दिवसभरात १ हजार २४४ नव्या रुग्णांची भर पडली. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या ३९ हजार ६८६ वर पोहोचली आहे. तसेच मुंबईत काल ५२ जणांनी कोरोनामुळे जीव गमावल्याने येथील कोरोनाबळींचा आकडा १ हजार २७९ वर पोहोचला आहे.

दुसरीकडे मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षातील टिष्ट्वटर सेलमध्ये कोरोनाने संक्रमण केले आहे. ८ पोलिसांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून, यापैकी एक योद्धा कोरोनावर मात करत पुन्हा सेवेसाठी सज्ज झाला आहे.

रविवारी पहाटे चारपर्यंतच्या आकडेवारीनुसार, १८३ अधिकारी आणि १२३८ अंमलदार अशा एकूण १४२१ पोलिसांवर उपचार सुरू आहेत. तर आतापर्यंत २६ पोलिसांना जीव गमवावा लागला आहे. यापैकी १६ हे मुंबई पोलीस दलातील आहेत. तर मुंबई पोलिसांच्या टिष्ट्वटर सेलमध्येही कोरोनाने संक्रमण केले. यापैकी पोलीस शिपाई दुर्गेश सावंत हा योद्धा कोरोनावर मात करत पुन्हा सेवेत हजर झाला आहे. तर अन्य ८ जणांवर उपचार सुरू असून तेही लवकरच बरे होतील. मरोळ येथे पोलिसांसाठी सुरू करण्यात आलेल्या रुग्णालयातून ४६ पोलिसांनी कोरोनावर मात केली असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी टिष्ट्वटरद्वारे दिली.

 

News English Summary: Corona has infected the Twitter cell of the Mumbai Police control room. The report of 8 police has come positive and one of these warriors has defeated Corona and is ready for service again.

News English Title: Corona virus transition Mumbai police control room twitter cell News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x