22 November 2024 6:06 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

मान्सूनचं केरळ किनारपट्टीवर आगमन, लवकरच महाराष्ट्रात धडकणार

The monsoon, arrived in Kerala

थिरुअनंतपूरम, १ जून: भारतात मान्सूनचं आगमन झालं असून केरळ किनारपट्टीवर धडक दिली आहे. भारतीय हवामान खात्याचे संचालक मृत्यूंजय मोहपात्रा यांनी पीटीआयशी बोलताना ही माहिती दिली आहे.

यंदा मान्सून ठरलेल्या वेळेपूर्वीच केरळमध्ये दाखल झाला आहे. मान्सून आणि हवामानविषयक माहिती देणाऱ्या स्कायमेटने दिलेल्या माहितीनुसार (Skymet) दक्षिण पश्चिम मान्सून यावर्षी ३० मे रोजीच केरळमध्ये दाखल झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी मान्सून ८ दिवस आधीच केरळमध्ये पोहोचला आहे. गेल्या आठवड्यात मान्सून १ जूनपर्यंत पोहोचेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. मात्र मान्सून १ जूनपूर्वीच दाखल झाला. २ ते ४ जून दरम्यान मुंबई व उपनगरामध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र, पावसाने आज मुंबईत हजेरी लावली.

दरम्यान मुंबईत आज सकाळी पावसाने हजेरी लावल्याचं पहायला मिळालं. दुसरीकडे अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे रविवारी रात्री राज्यात अनेक ठिकाणी वादळी पावसाने हजेरी लावली. समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र तीव्र होत जाणार असल्याने कोकणासह राज्याच्या बहुतांश भागाला पुढील चार दिवस पूर्वमोसमी वादळी पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

 

News English Summary: The monsoon has arrived in India and has hit the Kerala coast. This information was given by Mrityunjay Mohapatra, Director, Indian Meteorological Department, while talking to PTI.

News English Title: The monsoon has arrived in India and has hit the Kerala coast News Latest Updates.

हॅशटॅग्स

#india(222)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x