22 November 2024 10:03 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS
x

सावधान! देशातील अनेक भागात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा समूह संसर्ग - ICMR तज्ञ डॉक्टर

ICMR, Corona Virus, Community transmission

नवी दिल्ली, १ जून: जगभरातील दोनहून अधिक देशांमध्ये कोरोनाने हाहाकार माजवला आहे. भारतातील कोरोना परिस्थिती दिवसेंदिवस अधिकच गंभीर होत आहे. जगभरात कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशांच्या यादीत फ्रान्सला मागे टाकून भारत सातव्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्यामुळे आता चिंता अधिकच वाढली आहे.

रविवारी रात्रीपर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार, भारतात कोरोनाचे १ लाख ९० हजार ६०९ रुग्ण आहेत. तर फ्रान्समध्ये कोरोनाचे १ लाख ८८ हजार ८८२ रुग्ण असून भारताने फ्रान्सला मागे टाकले असून नवव्या क्रमांकावरुन सातव्या क्रमांकावर पोहोचला आहे. दरम्यान, या यादीत पहिल्या क्रमांकावर अमेरिका अद्याप कायम असून अमेरिकेतील जवळपास १८ लाख जणांना कोरोनाने ग्रासले आहे. अमेरिकेनंतर या यादीत ब्राझील आणि रशियाचा क्रमांक आहे. ब्राझीलमध्ये कोरोनाचे पाच लाख तर रशियात चार लाख रुग्ण आहेत.

दुसरीकडे देशाची चिंता वाढवणारी बातमी पुढे आली आहे. एम्सचे डॉक्टर आणि आयसीएमआर संशोधन गटाच्या दोन सदस्यांसह आरोग्य तज्ञांच्या गटाने म्हटले आहे की, ‘सध्या स्थितीवरून देशातील अनेक भागांमध्ये कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर समूह संसर्ग फोफावल्याचं दिसत आहे. ICMR तज्ज्ञांकडून हे समोर आल्याने सरकारची देखील चिंता वाढण्याची शक्यता आहे आणि याबाबात पीटीआयने अधिकृत वृत्त दिलं आहे. कारण सरकारने देखील लॉकडाउन उठवण्याच्या किंवा शिथिल करण्याच्या दिशेने आधीच पाऊल टाकलं आहे.

 

News English Summary: Community transmission of coronavirus infection has been well-established across large sections or sub-populations in country, says group of health experts, including doctors from AIIMS and two members of an ICMR research group on COVID-19.

News English Title:  Community transmission of coronavirus infection has been well-established across large sections or sub populations in country News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x