वादळाच्या पार्श्वभूमीवर बीकेसीच्या कोविड सेंटरमधून रुग्णांना हलवण्याचं काम सुरु
मुंबई, २ मे: कोरोना महामारीच्या संकटाबरोबरच आता पश्चिम महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवर आणि मध्य महाराष्ट्रात ‘निसर्ग’ चक्रीवादळाचे संकट उभे राहिले आहे. ३ जून रोजी हे चक्रीवादळ उत्तर महाराष्ट्र आणि दक्षिण गुजरातमधून जाणार आहे. या वादळाचा फटका रत्नागिरी, ठाणे, पालघरसह मुंबईलाही बसण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी आणि पालघर व डहाणू येथे एनडीआरएफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या असून मुंबईमध्ये तटरक्षक दल, नौ दल, मुंबई अग्निशमन दल आणि एनडीआरएफच्या तुकड्यांना तैनात ठेवण्यात आले आहे. तसेच मुंबईतील महापालिकेच्या २४ विभागांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे या निसर्ग चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे कोकण किनारपट्टीला अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. समुद्रात मच्छीमारीसाठी गेलेल्या शेकडो बोटींना किनार्यावर बोलवण्यात आले आहे. रत्नागिरीमध्ये २६ जणांची एनडीआरएफची टीम चिपळूण येथे दाखल झाली आहे. रत्नागिरीमध्ये कोस्ट गार्डदेखील तयारीत आहेत. चक्रीवादळाचा मुकाबला करण्यासाठी राज्य सरकारने एका विशेष नियंत्रण कक्षाची स्थापना केली आहे. नियंत्रण कक्षातून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे. रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर जिल्ह्यात एनडीआरएफच्या टीम पोहोचल्या आहेत.
वादळाच्या पार्श्वभूमीवर बीकेसीच्या एमएमआरडीए मैदानातील कोविड सेंटर येथून कोरोना रुग्णांना हलविण्यात येत आहे. या सर्व रुग्णांना वरळीच्या एनएससीआय आणि गोरेगाव येथील कोविड सेंटरमध्ये शिफ्ट केलं जात आहे. बसच्या माध्यमातून रुग्ण हलवण्याचं काम सुरु आहे.
आतापर्यंत चार बसमधून १०० हून अधिक रुग्णांना बीकेसीच्या एमएमआरडीएमधून वरळी आणि गोरेगाव येथे हलविण्यात आलं आहे. वादळाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून ही खबरदारी घेण्यात येत आहे. बीकेसीच्या कोविड सेंटरमध्ये सध्या एकूण २४२ कोरोना रुग्ण आहेत.
News English Summary: Corona patients are being evacuated from the Covid Center at BKC’s MMRDA grounds in the wake of the storm. All these patients are being shifted to NSCI, Worli and Kovid Center, Goregaon. Work is underway to move the patient by bus.
News English Title: Work began to evacuate corona patients from BKC Covid 19 center in the wake of the storm News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Loan EMI Payment | तुम्ही सुद्धा EMI भरायला विसरता, तुमच्या एका चुकीमुळे होईल प्रचंड नुकसान, संपूर्ण डिटेल्स वाचा - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- NTPC Share Price | मल्टिबॅगर एनटीपीसी शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPC
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार