18 October 2024 2:51 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर देणार मोठा परतावा, शेअरखान ब्रोकरेजचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: HAL NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: NBCC Vedanta Share Price | मल्टिबॅगर वेंदाता शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला, रिपोर्टमध्ये तुफान तेजीचे संकेत - NSE: VEDL Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत फायद्याची अपडेट, पेनी शेअरवर होणार परिणाम - NSE: IDEA Wipro Share Price | आता नाही थांबणार, रॉकेट स्पीडने होणार कमाई, विप्रो शेअर करणार मालामाल - NSE: WIPRO IREDA Share Price | मल्टिबॅगर IREDA शेअरमध्ये तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलीश, यापूर्वी दिला 270% परतावा - NSE: IREDA Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज सहित या 9 शेअर्ससाठी 'BUY रेटिंग, मिळेल 30% पर्यंत परतावा - NSE: Reliance
x

बिहारमध्ये मजुरांचा १४ दिवसांचा कॉरंटाईन होताच घरी जाताना कंडोम वाटप

Bihar govt, distributing free condoms, migrant labourers, 14 day institutional quarantine

पाटणा, २ जून: कोरोनाविरुद्धच्या लढाईत केंद्र सरकार आणि राज्य सरकार झोकून देऊन काम करत आहेत. मात्र, कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. महाराष्ट्र हे कोरोनाचं हॉटस्पॉट राज्य ठरलं असून महाराष्ट्रातून परराज्यात जाणाऱ्या मजूरांची संख्या लक्षणीय आहे. त्यात, उत्तर प्रदेश व बिहारमध्ये अधिक संख्येने मजूर जातना दिसत आहेत. त्यामुळेच, क्वारंटाईन सेंटरमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांना ठेवण्यात आले आहे. आता, बिहार सरकारने एक मजेशीर निर्णय घेतला आहे. कुटुंब नियोजन योजनेच्या जनजागृतीसाठी क्वारंटाईन सेंटरमधील प्रवाशांना कंडोम देण्यात येणार आहे.

बिहारमधील आरोग्य विभागाने पुढाकार घेत, क्वारंटाईन अवधी पूर्ण केल्यानंतर संबंधित नागरिकांना कंडोम वाटप करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. १४ दिवसांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण केल्यानंतर, संबंधित प्रवाशांना कुटुंब नियोजनाचे महत्व अन् माहिती देऊन आवश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यात येणार आहे. डोअर टू डोअर आरोग्य तपासणीवेळी पोलिओच्या सुपरवायझरकडून १४ दिवसांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण करणाऱ्यांस कंडोम देण्यात येणार आहे. नवभारत टाइम्सच्या बातमीनुसार, केअर इंडिया कुटुंब नियोजन समन्वयक अमित कुमार यांनी याबाबत माहिती दिली. पोलिओ अभियानासाठी संबंधित सुपरवायझरांना याचे ट्रेनिंग देण्यात आले असून कंडोमचे बॉक्सही दिले आहेत. घर-घर तपासणीवेळी क्वारंटाईन कालावधी पूर्ण करणाऱ्यांस हे कंडोम देण्यात येणार आहे.

दरम्यान, जगभरातील कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशांच्या यादीत भारत सातव्या क्रमांकावर पोहोचला आहे. भारतात गेल्या २४ तासांत तब्बल ८,१७१ नव्या रुग्णांची नोंद झाल्याने एकूण कोरोनाबाधितांचा संख्या १ लाख ९७ हजार ५८१ वर पोहोचली आहे. तर २४ तासांत २०४ कोरोना रुग्णांनी आपला जीव गमावल्याने देशातील कोरोनाबळींची संख्या ५ हजार ५९८ इतकी झाली आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे देशभरात आतापर्यंत ९५ हजार ५२६ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून सध्या ९७ हजार ५८१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. एका आठवड्यापूर्वी कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशांच्या यादीत भारत नवव्या क्रमांकावर होता, मात्र आता देशातील रुग्णांची संख्या फ्रान्समधील रुग्णांपेक्षा जास्त झाली असून या यादीत भारत सातव्या क्रमांकावर पोहोचला आहे.

 

News English Summary: Bihar govt distributing free condoms to migrant labourers going home after completing 14-day institutional quarantine and those in home quarantine to prevent unwanted pregnancies News latest Updates.

News English Title: Bihar govt distributing free condoms to migrant labourers after completing 14 day institutional quarantine News latest updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x