भारताच्या उत्तर सीमेवर चीनच्या मोठ्याप्रमाणावर सैन्य हालचाली, अमेरिकेकडून संताप
वॉशिंग्टन, २ जून: अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माइक पॉम्पिओ यांनी चीनने भारताच्या उत्तर सीमेवर सैन्य आणि शस्त्रास्त्रे आणून उभी केल्यामुळे संताप व्यक्त केला आहे. ते म्हणाले, आधी या हुकूमशहा चीनने संपूर्ण जगापासून कोरोना व्हायरस महामारी लपविली आणि संपूर्ण जगाला कोरोनाच्या संकटात लोटले. त्यानंतर चीन हॉंगकॉंगमधील लोकांच्या स्वातंत्र्याचा गळा घोटत आहे. आता भारताला धमकावण्यासाठी भारताच्या सीमेवर सैन्य उभे केले आहे.
अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पॉम्पिओ हे AEIच्या पॉडकॉस्ट कार्यक्रम What The Hell Is Going On?मध्ये बोलत होते, त्यांनी चीनवर हल्लाबोल केला आहे. उत्तर भारताच्या सीमेच्या वास्तविक नियंत्रण रेषेजवळ चीन आपली लष्करी उपस्थिती वाढवत आहे, हे आपण सतत पाहत आहोत. गेल्या काही आठवड्यापासून लडाख आणि उत्तर सिक्कीमच्या बर्याच भागात चिनी आणि भारतीय सैन्याची उपस्थिती वाढली आहे, ज्यामुळे दोन्ही देशांच्या सैन्यामधील तणाव समोर आला आहे.
चीनच्या आक्रमक वृत्तीवर पॉम्पिओ म्हणाले की, कोरोना व्हायरसने पसरलेल्या कोरोनाच्या साथीच्या रोगाबद्दल चीन जगभर आपल्या भूमिकेनं लोकांचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत आहे. हाँगकाँगमध्ये तो लोकांच्या स्वातंत्र्यावर हल्ला करीत आहे. चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या या टप्प्यांमधून त्यांचा भयंकर चेहरा स्पष्ट दिसून येतो आहे. चीन बौद्धिक मालमत्ता चोरून दक्षिण चिनी समुद्रात आपली उपस्थिती वाढवित आहेत. अशी पावले अधिराज्यवादी राजवट उचलत असतात आणि ते काय करीत आहेत, याचा चिनी लोकांवर किंवा एकट्या हाँगकाँगच्या लोकांवर किती विपरीत परिणाम होणार आहे, याचा त्यांनी विचारही केलेला दिसत नाही. त्याचा संपूर्ण जगावरही वाईट परिणाम होणार असल्याचा इशाराही माइक पॉम्पिओ यांनी दिला आहे.
News English Summary: US Secretary of State Mike Pompeo, speaking on AEI’s podcast program What The Hell Is Going On ?, has attacked China. We are constantly seeing China increasing its military presence near the Line of Actual Control on the North Indian border.
News English Title: China Army has moved upto North India along LAC says US Secretary Mike Pompeo angry News latest updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार