22 November 2024 5:05 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

श्रीमंतांची रूग्णालये सरकारच्या आदेशाला जुमानत नसल्याने कारणे दाखवा नोटीस

Bombay hospital, Lilavati hospital, Covid 19, get notice

मुंबई, २ मे: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खासगी रुग्णालयातील ८० टक्के खाटा राज्य शासनाने ताब्यात घेतल्या आहेत. मात्र अद्यापही काही ठिकाणी रुग्णांना खासगी रुग्णालयांकडून अपेक्षित ते सहकार्य होत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. त्याची दखल घेऊन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल रात्री मुंबईतील खासगी रुग्णालयांना अचानक भेटी दिल्या. मंगळवारी पहाटे दोन वाजेपर्यंत आरोग्यमंत्री रुग्णालयातील खाटांच्या उपलब्धतेबाबत माहिती घेत होते.

दरम्यान, मुंबईतील श्रीमंतांची रूग्णालये म्हणून ओळख असलेली बॉम्बे हॉस्पिटल, लीलावती, हिंदुजा आणि जसलोक रुग्णालये हे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना अशा तीन-तीन पक्षांच्या महाविकास आघाडीलाही जुमानत नाहीत. राज्य सरकारने कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर या बड्या रुग्णालयांना 80% बेड्स नियंत्रित दरात राखून ठेवण्यास सांगितले होते. मात्र या चारही बड्या श्रीमंतांच्या रुग्णालयांनी सरकारच्या आदेशाला केराची टोपली दाखविली आहे. त्यामुळे आता राज्य सरकारने या चारही रुग्णालयांना नोटीस बजावली आहे.

काल रात्री राज्याच्या आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी या चारही रुग्णालयांचा फेरफटका मारला. त्यावेळी त्यांना या श्रीमंत रुग्णालयातील अनेक बेड्स रिकामे असल्याचे आढळले. तरीही रुग्णालये सरकारने पाठविलेल्या रुग्णांना त्या हॉस्पिटलमध्ये दाखल करून घेत नाहीत. वास्तविक सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील बड्या रुग्णालयांना 80% बेड्स नियंत्रित दरात राखून ठेवण्यास सांगितले होते. मात्र ज्यावेळी सरकारतर्फे या रुग्णालयांमध्ये रुग्णांना पाठविले जायचे, त्यावेळी त्यांना तेथे दाखल करून घेण्यास स्पष्ट नकार दिला जात होता. म्हणजेच सरकारी आदेशाचा खुल्लम खुल्ला अवमान केला जात होता.

 

News English Summary: The Bombay Hospital, Lilavati, Hinduja and Jaslok Hospitals, which are known as the hospitals of the rich in Mumbai, do not even support the three-party alliance of Congress, NCP and Shiv Sena. The state government had asked these big hospitals to maintain 80% beds at a controlled rate in the wake of the Corona epidemic.

News English Title: Bombay hospital Lilavati and two other hospitals get notice from state government News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x