22 November 2024 6:46 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

रत्नागिरी- भगवती बंदरात जोरदार लाटांमुळे जहाज भरकटले

ship hit a protective wall, Ratnagiri

रत्नागिरी, ३ जून: निसर्ग’ चक्रीवादळ आज कोकण किनारपट्टीवर धडकणार आहे. या वादळापूर्वी कोकण, मुंबईसह अनेक भागांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. आज रत्नागिरीतील मिऱ्या समुद्रावर फेसाळलेल्या लाटांमध्ये जहाज भरकटले होते. जहाजाला मिरकरवाडा बंदरात नेण्याचे प्रयत्न अयशस्वी ठरल्याने खवळलेल्या समुद्राशी जहाजाची झुंज सुरू होती. अखेर काही वेळाने हे जहाज पंधरा माड परिसरात संरक्षक भिंतीवर येऊन धडकले. दरम्यान, मिऱ्या समुद्रावर अजस्त्र लाटा उसळलेल्या असताना जहाज भरकटल्याचे दृश्य पाहायला मिळाले. सध्या जहाजावर अडकलेल्या खलाशांना वाचवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

दरम्यान जहाजावर काही खलाशी अडकल्याची भीती असून समुद्राच्या अजस्त्र लाटांशी जहाजाची झुंज सुरु आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘निसर्ग’ चक्रीवादळाचा तडाखा उत्तर रत्नागिरी जिल्ह्यातील किनारी भागाला जास्त बसण्याची शक्यता असल्यामुळे मंडणगड, गुहागर आणि दापोली या तीन तालुक्यातील सुमारे चार हजार लोकांचे स्थलांतर जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

 

News English Summary: Today, the ship was stranded in the waves of Mirya sea in Ratnagiri. Attempts to take the ship to Mirkarwada port failed and the ship was battling the stormy sea. Eventually, the ship hit a protective wall in the 15-yard area.

News English Title: ship hit a protective wall in the 15 yard area News latest updates.

हॅशटॅग्स

#Maharashtra(207)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x