24 November 2024 3:52 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा मल्टिबॅगर शेअर, तब्बल 4300% परतावा दिला, फायद्याची अपडेट - BOM: 543620 IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News 8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर, नव्या वर्षात पगारात 186 टक्क्यांनी वाढ होणार, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | 10 रुपयाचा शेअर श्रीमंत करणार, 6 महिन्यात 116% परतावा दिला, संधी सोडू नका - BSE: 540259 Apollo Micro Systems Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: APOLLO
x

फडणवीस मुंबई पालिकेला शॉक द्यायला गेले, पण पुणे पालिकेमुळे त्यांनाच शॉक बसला

People front of India, opposition leader Devendra Fadnavis, corona cases|

मुंबई, ३ जून : मुस्लिम कोरोनाबाधित रुग्णाच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांना का देण्यात आली अशी विचारणा भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यांच्या आरोपाला पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाने जशास तसे उत्तर दिले आहे. कोरोना रुग्णांच्या आड भाजप घाणरेडे राजकारण करत आहे, अशी टीका या संघटनेनं केली.

देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी ट्वीट करून मुंबई पालिकेच्या आरोग्य विभागाचे एक पत्र प्रसिद्ध केले होते. या पत्रात कोरोनामुळे मुस्लिम समाजातील व्यक्तींचा मृत्यू झाल्यास त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचे काम हे पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाला देण्यात आले. कोरोनामुळे मुस्लिम समाजातील व्यक्तींचा मृत्यू झाल्यास दफनविधीसाठी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाला समन्वयाची जबाबदारी दिल्याबद्दल विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी धक्का बसल्याचं म्हटलं होतं.

मात्र देवेद्र फडणवीस यांच्या टीकेनंतर पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सय्यद युसुफ सादात यांनी पत्र लिहून भाजपा घाणेरडं राजकारण करत असल्याचा आरोप केला आहे. २४ तारखेला झालेल्या लॉकडाऊन घोषणेनंतर पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाने मतदकार्य सुरु केलं होतं. तसेच, कोरोना रुग्णांच्या अंत्यसंस्कारासाठी नातेवाईक पुढे येईनात, त्यामुळे अंत्यसंस्कारासाठी जबाबदारी घेण्याची विनंती संघटनेनं प्रशासनाकडे केली. त्यानंतर, प्रशासनाच्या परवानगीनंतर पुणे येथून अंत्यसंस्कार मदतीच्या कार्याला संस्थेने सुरुवात केल्याचं या पत्रात म्हटलं आहे. पुण्यानंतर, नांदेड, परभणी, औरंगाबाद आणि मुंबई महापालिकेतूनही या कार्यात मदतीसाठी काम करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यातून आत्तापर्यंत संघटनेच्या माध्यमातून १४० लोकांचे अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे महापालिकेत भाजपाची सत्ता आहे, त्यामुळे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुणे महापालिकेकडून परवानगी देण्यात आली, त्यावेळी हे आश्चर्य का वाटलं नाही? असा सवालही फ्रंटने विचारला आहे.

 

News English Summary: Opposition leader Devendra Fadnavis had asked why Popular Front of India (PFI) activists were given the responsibility of disposing of the body of a Muslim coronet-infected patient. The Popular Front of India has responded to his allegations. This organization criticized that BJP is doing dirty politics on behalf of Corona patients.

News English Title: People front of India slap to opposition leader Devendra Fadnavis on corona cases News Latest updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x