5 November 2024 10:03 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BEL Share Price | डिफेन्स कंपनीबाबत फायद्याची अपडेट, मल्टिबॅगर शेअर फोकसमध्ये, तुफान तेजीचे संकेत - NSE: BEL Penny Stocks | चिल्लर प्राईस पेनी शेअर श्रीमंत करणार, 30 दिवसात 103% परतावा दिला, स्टॉक खरेदीला गर्दी - Penny Stocks 2024 HUDCO Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, HUDCO शेअर फोकसमध्ये, मिळेल 65% परतावा - NSE: HUDCO RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, पुन्हा तेजीचे संकेत - NSE: RVNL SJVN Share Price | SJVN शेअर रॉकेट होणार, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SJVN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम- NSE: RELIANCE Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL
x

आता शेतकऱ्यांना आपला माल थेट कंपन्यांना विकता येणार, केंद्रीय कॅबिनेटचे नवे निर्णय

Modi Govt, Union Cabinet decision, Farmers

नवी दिल्ली, ३ जून: कोरोनाच्या संकटात आज मोदींच्या मंत्रिमंडळाची बैठक झाली असून, या बैठकीत सहा मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. या सहा मोठ्या निर्णयांमध्ये तीन निर्णय हे शेतकऱ्यांशी संबंधित आहेत. आता देशातील शेतकर्‍यांना एक देश एक बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना थेट आपला माल कंपन्यांना विकता येणार आहे. तसेच अत्यावश्यक वस्तू कायदा, APAC कलमातील सुधारणांना मान्यता देण्यात आली आहे.

या निर्णयाबद्दल माहिती देताना केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले की, शेतीसंदर्भात ऐतिहासिक निर्णय घेण्यात आले आहेत. ५० वर्षांहून अधिक काळ प्रलंबित असलेल्या शेतक-यांच्या मागण्या सरकारने पूर्ण केल्या आहेत.

शेतकरी हितासोबतच त्यांनी काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. यामध्ये कोलकाता बंदरला श्यामा प्रसाद मुखर्जींचे नाव देण्यात येणार आहे. तर, देशातील १४ कोटी शेतकऱ्यांपैकी 85% लघु आणि मध्यम आहेत. त्यांना आपल्या उत्पादनाचे मूल्य मिळत नाही. यामुळे अडचणी येतात. त्यामुळे सरकार सतत शेतकऱ्यांच्या हितासाठी निर्णय घेत आहे. 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे लक्ष्य आहे. तसेच, यावेळी देशातील गुंतवणूक वाढविण्यासाठी सचिवांचे सशक्तीकरण गट (EGoS) आणि प्रकल्प विकास विक्री (PDCs) तयार करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

शेतकऱ्यांना स्वातंत्र्य मिळण्यासाठी अत्यावश्यक वस्तू कायद्यात दुरुस्ती करण्यात आली आहे. ते आपली उत्पादने कोठे, कशी आणि कोणत्या किंमतीला विकायची हे शेतकरी ठरवू शकतील. भाजी मंडी किंवा अन्नधान्य मंडी येथील निर्बंध उठवले जातील. सोबतच, बाहेर कुठल्याही प्रकारच्या इंस्पेक्टर अर्थात फूड इंस्पेक्टर, क्वालिटी इंस्पेक्टर, एक्साइस, कर इंस्पेक्टर अशा लोकांचा दबाव राहणार नाही याची विशेष काळजी घेण्यात आली.

शेतकरी आणि व्यापारी यांच्यात वाद झाल्यास तो कोर्टाबाहेर ठेवला जाईल. पहिली तक्रार एसडीएमकडे करण्यात येईल. त्यांना ३० दिवसांत निर्णय घ्यावा लागेल. एसडीएमच्या निर्णयावर समाधानी नसल्यास ते जिल्हाधिकाऱ्यांकडे अपील करू शकतील.

 

News English Summary: Modi’s cabinet met today on the Corona crisis and took six major decisions. Of these six major decisions, three are related to farmers. Now one country one market will be available to the farmers of the country. This will enable farmers to sell their produce directly to companies.

News English Title: India farmers to sell their produce directly to companies Union Cabinet decision News latest Updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x