22 November 2024 1:19 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Railway Ticket Booking | जनरल तिकिटाच्या पैशांत करता येईल AC कोचमधून प्रवास; 90% प्रवाशांना 'हा' नियम माहित नाही SBI Mutual Fund | SBI ची हेल्थकेअर म्युच्युअल फंड योजना देतेय घसघशीत परतावा; 2500 चे होतील 1 करोड रुपये - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO
x

राजभवनाच्या दारावर काही चक्रम वादळे अधूनमधून येत असतात - शिवसेना

Shivsena, Saamana Newspaper, occasional cyclones, Raj Bhavan

मुंबई, ४ जून: राजभवनाच्या दारावर काही चक्रम वादळे अधूनमधून आदळत असतात. राज्यपालांनी अशा चक्रम वादळांपासून सावध राहायला हवे. अन्यथा लाखे विद्यार्थ्यांचे भविष्य उद्ध्वस्त होण्याचा धोका आहे, अशा कानपिचक्या ‘सामना’च्या अग्रलेखातून देण्यात आल्या आहेत.

“राज्यपाल व राज्य सरकारमध्ये सध्या पदवीच्या अंतिम परीक्षा घेण्यावरुन मतभेदांचे जाहीर प्रदर्शन सुरु आहे. राज्यपालांच्या सद्सदविवेकबुद्धी बुद्धीवर आमचा विश्वास आहे, पण राजभवनाच्या दारावर काही चक्रम वादळे अधूनमधून आदळत असतात. राज्यपाल हे भले गृहस्थ आहेत. त्यांनी अशा चक्रम वादळांपासून सावध राहायला हवे. अन्यथा लाखे विद्यार्थ्यांचे भविष्य उद्ध्वस्त होण्याचा धोका आहे” अशी भीती अग्रलेखातून व्यक्त करण्यात आली आहे.

दरम्यान, एरवी राज्यपाल अधिकाऱ्यांना बोलावून त्यांच्या आढावा बैठका की काय त्या घेतच असतात व समांतर सत्ताकेंद्र चालवत असतात. मग अंतिम परीक्षांच्या मुद्द्यासंदर्भातही राज्यपालांना संबंधित घटकांची अशी बैठक घेऊन हा विषय समजावून घेता आला असता, असेही शिवसेनेने म्हटले आहे.

तरीही आमचा राज्यपालांच्या सद्सदविवेकबुद्धीवर विश्वास आहे. पण राजभवनाच्या दारावर काही चक्रम वादळे अधूनमधून येत असतात. राज्यपाल हे भले गृहस्थ आहेत. त्यांनी अशा चक्रम वादळांपासून सावध राहायला हवे. अन्यथा लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य उद्ध्वस्त होण्याचा धोका आहे. कायदा हा फक्त विद्यापीठ नव्हे तर सर्व क्षेत्रांना लागू आहे. कायद्यानेच कोणी वागायचे म्हटले तर जनता साखरझोपेत असताना महाराष्ट्रावरील राष्ट्रपती राजवट उठवून बेकायदा शपथविधी पार पडलाच नसता, असा सणसणीत टोलाही ‘सामना’च्या अग्रलेखातून लगावण्यात आला आहे.

 

News English Summary: There are occasional cyclones at the entrance of Raj Bhavan. Governors should be wary of such cyclonic storms. Otherwise, the future of millions of students is in jeopardy, according to the headline of the match.

News English Title: There are occasional cyclones at the entrance of Raj Bhavan says Shivsena in Saamana Newspaper News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x