22 November 2024 5:19 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

अनलॉक १.० : हॉटेल, रेस्टॉरंटसाठी केंद्र सरकारची नियमावली जारी

Lockdown, Unlock, Restaurants Food Courts In Malls

मुंबई, ५ जून: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं लॉकडाउनचा निर्णय घेतला होता. तब्बल दोन महिन्यांनंतर लॉकडाउन शिथिल करण्यास सुरूवात झाली आहे. केंद्र सरकारनं धार्मिक स्थळं, मॉल, हॉटेल खुली करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी काही नियम व अटी सरकारकडून घालण्यात आल्या आहेत. या नियमांचे पालन याठिकाणी जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने करणं बंधनकारक आहे. मात्र ही सुविधा कन्टेंन्मेंट झोनसाठी पूर्णपणे बंद आहे.

हॉटेल खुली करण्याची परवानगी देतानाच सरकारनं कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी काही महत्त्वाचे नियम घातले आहेत. यात ग्राहकाने स्वतःच्या मेडिकल व ट्रॅव्हल हिस्ट्रीची माहिती देणं अनिवार्य केलं आहे.

दुसरीकडे कोरोनावर मात करण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेल्या ‘मिशन बिगीन अगेन’ धोरणाला आजपासून सुरुवात झाली आहे. या मिशनचा पहिला आणि दुसरा टप्पा आजपासून सुरू होत आहे. त्यानुसार राज्यातील अनेक ठिकाणी काही प्रमाणात शिथिलता येणार आहे. महत्त्वाचे म्हणजे मुंबई आणि पुणे आजपासून अंशतः सुरू होणार आहे. पुण्यात महिलांमध्ये खरेदीसाठी प्रसिद्ध असलेली तुळशीबाग, हॉंगकॉंग, मंडई लेन हे सम-विषम पद्धतीनुसार आजपासून सुरु होणार आहेत. येथील सर्व दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत सुरु राहतील.

धार्मिक स्थळ, मंदिरांसाठी काय आहेत नवीन नियम

  • आपल्या चपला शक्य असल्यास गाडीतच ठेवाव्यात. अन्यथा सोशल डिस्टन्सचं पालन करून त्या योग्य अंतरावर ठेवाव्यात
  • मंदिर परिसरात जाण्याआधी साबणानं हात-पाय तोंड स्वच्छ धुवा.
  • मंदिर परिसरात सोशल डिस्टन्सिंगचं पालन करून रांगेत उभं राहावं.
  • हाताने प्रसाद, तीर्थ देण्यास मनाई करण्यात आली आहे.

 

News English Summary: The lockdown was decided by the central government against the backdrop of Corona. After a staggering two months, the lockdown has begun to ease. The central government has decided to open religious places, malls and hotels. Some rules and regulations have been laid down by the government for this.

News English Title: 50 Seats In Restaurants Food Courts In Malls News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x