20 April 2025 9:33 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | पगारदारांनो, ही फंडाची योजना गुंतवणूकदारांचे पैसे 4 ते 5 पटीने वाढवत आहे, इथे पैसा वाढवा Horoscope Today | 20 एप्रिल 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Kalyan Jewellers Share Price | सोनं नव्हे, सोनं बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्स खरेदी करा, झपाट्याने पैसा वाढेल - NSE: KALYANKJIL Mishtann Foods Share Price | 5 रुपयांचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - BOM: 539594 Motherson Sumi Wiring Price | शेअर प्राईस 52 रुपये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, किती परतावा मिळेल पहा - NSE: MSUMI Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 20 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bajaj Finance Share Price | लाखो टक्क्यांमध्ये परतावा देणारा शेअर, आता पुढची टार्गेट प्राईस ही आहे - NSE: BAJFINANCE
x

उद्धव ठाकरेंच्या आदेशानंतर शिवसेना शाखेचे क्लिनिकमध्ये रूपांतर होण्यास सुरुवात

Shivsena shakha, Corona Virus, private clinic for treatment

मुंबई, ५ जून: राज्यात आज १३५२ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून आतापर्यंत ३३ हजार ६८१ जण पूर्णपणे बरे झालेले आहेत. तसंच आज नव्या २९३३ रुग्णांची भर पडली व १२३ जणांनी आपला जीव गमावला आहे. त्यामुळे एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता ७७ हजार ७९३ इतकी झाली आहे. तर सध्या ४१ हजार ३९३ एक्टिव्ह रुग्ण असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

दुसरीकडे मुंबईतील खासगी दवाखाने वारंवार सांगूनही आपले दरवाजे उघडत नाहीत. यामुळे करोना सोडून इतर व्याधींनी ग्रस्त असलेल्या मुंबईकर नागरिकांना दवाखान्यांसाठी दारोदारी फिरावे लागते. सर्वांना कायद्याचा बडगा दाखवून चालत नाही आणि माणुसकी दाखवली पाहिजे म्हणून ज्या पद्धतीने शिवसेनेच्या सुरुवातीच्या काळात मराठी तरुण शाखा शाखांमधून मोठ्या संख्येने आपली नोंद करत समाजकार्याला स्वतःला वाहून घेत होते, आता त्याच धर्तीवर शिवसेना शाखा या खासगी दवाखाने करण्यात येणार असून यासाठी लवकरच शाखाप्रमुख यांना आदेश देणार असल्याचे शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले होते.

संकटाच्या काळात आणि आपत्कालीन परिस्थितीत शिवसैनिक हा कायम पुढे असतो. त्यामुळे रुग्णांची हेळसांड होऊ नये म्हणून शिवसेनेच्या शाखांमध्ये तात्पुरते दवाखाने तुम्हाला कार्यरत दिसतील, असा विश्वास मुख्यमंत्री ठाकरे यांनी शुक्रवारी मुंबईतीत निवडक संपादकांच्या चर्चेत व्यक्त केला होता. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक, दादर (जुना महापौर बंगला) येथे सुमारे तासभर झालेल्या चर्चेत करोनाबाबतच्या उपाययोजना आणि राज्य सरकारची तयारी याबाबत मुख्यमंत्र्यांनी मार्गदर्शन केले होते.

त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जाहीर केल्याप्रमाणे वरळी शाखा क्र. १९६ आणि माहीम शाखा क्र. १९१ शाखेचे क्लिनिकमध्ये रूपांतर करण्यात आले आहे. अजून शाखांचे रूपांतर क्लिनिकमध्ये करण्यात येणार आहे ते स्पष्ट नसलं तरी सुरुवात झाल्याचं पाहायला मिळत आहे.

 

News English Summary: As announced by Shiv Sena party chief, Chief Minister Uddhav Balasaheb Thackeray, Worli Shakha No. 196 and Mahim Shakha No. The 191 branch has been converted into a clinic News latest updates.

News English Title: Shivsena shakha made a private clinic for treatment news latest updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या