तर तुम्ही देखील सोनू सूद सारखे प्रसिद्ध व्हाल; मनसेचा राऊतांना खोचक टोला
मुंबई, ८ जून: मनसे आणि शिवसेना पुन्हा एकदा आमनेसामने आल्याचं दिसतंय. सोनू सूद वरून सुरू झालेलं राजकारण काही थांबायचं नाव घेत नाही. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी राऊतांना सल्ला दिला आहे. सोनू सूद सारखं प्रसिद्ध व्हायचं असेल तर तुम्ही काय करायला हवं? असं संदीप देशपांडेंनी या व्हिडिओत म्हटलं आहे.
संदीप देशपांडे यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला असून याद्वारे संजय राऊत यांना लक्ष्य केलं आहे. राऊत साहेब, सध्या महाराष्ट्राची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. एक तर टेस्ट होत नाहीत. टेस्ट झाल्या तर ऍम्ब्युलन्स मिळत नाहीत. ऍम्ब्युलन्स मिळाली तर सरकारी रूग्णालयात जागा मिळत नाही. जागा मिळालीच तर सरकारी रूग्णालयाची परिस्थिती वाईट आहे. खासगी रूग्णालये वाटेल तशी बिलं आकारत आहेत. अशी सद्या रूग्णांची अवस्था आहे. आपण जर रूग्णांची अवस्था सुधारलीत तर आपण देखील सोनू सूद सारखे प्रसिद्ध होऊ शकता. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जर रूग्णांना दिलासा देण्याचं काम जर केलंत. तर मी स्वतः सामना प्रेसवर येऊन आपल्या पाया पडायला तयार आहे, असं संदीप देशपांडे म्हणाले.
तर नक्कीच सामना वर येऊन पाया पडीन pic.twitter.com/WPdAGXEQFR
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) June 8, 2020
लॉकडाउनमुळे अडकलेल्या स्थलांतरित मजुरांना त्यांच्या गावी सुखरुप पोहोचवण्याचं काम करणारा अभिनेता सोनू सूद याला अप्रत्यक्षपणे भाजपाचा पाठींबा असल्याचा संशय राऊत यांनी व्यक्त केला होता. दरम्यान, संजय राऊत यांनी सोनूच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याच्या पार्श्वभूमीवर सोनू सूदने रविवारी रात्री ‘मातोश्री’वर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.
News English Summary: It seems that MNS and Shiv Sena have come face to face once again. The politics that started with Sonu Sood is not going to stop. MNS general secretary Sandeep Deshpande has given advice to Raut. What do you do if you want to be famous like Sonu Sood? That is what Sandeep Deshpande has said in this video.
News English Title: Mns Sandeep Deshpande On Shiv Sena Sanjay Raut Criticism About Sonu Sood News latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Loan EMI Payment | तुम्ही सुद्धा EMI भरायला विसरता, तुमच्या एका चुकीमुळे होईल प्रचंड नुकसान, संपूर्ण डिटेल्स वाचा - Marathi News
- Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- NTPC Share Price | मल्टिबॅगर एनटीपीसी शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPC
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, पुन्हा मोठी कमाई होणार - NSE: TATAMOTORS