चांगलं काम करणारे भाजपामध्येच असतात याचा आम्हाला आनंद....सेनेचा आभारी
मुंबई, ८ जून: शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून अभिनेता सोनू सूदवर करण्यात आलेल्या टीकेनंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले आहे. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी यावरुन शिवसेनेला खोचक टोला लगावला. शिवसेनेला ठाम विश्वास आहे की, सोनू सूद हे भाजपचे आहेत. या गोष्टीचा मला आनंदच वाटला. कारण, चांगले काम करणारी लोकं भाजपमध्येच असतात, अशी टिप्पणी देवेंद्र फडणवीस यांनी केली.
“कोणीही चांगलं काम केलं तर त्या कामाचं कौतुक झालं पाहिजे. सोनू सूद यांनी चांगलं काम केल्याबरोबर ते भाजपाचे आहेत, असं सांगितलं गेलं. शिवसेनेचा ठाम विश्वास दिसतो की चांगलं काम करणारे हे भाजपामध्येच आहेत. आम्हाला याचा आनंद आहे आणि त्यांचा आभारी आहे. पण सोनू सूद यांच्यावर कोणताही अन्याय होऊ नये म्हणून सांगतो, त्यांनी स्वतःच्या हिंमतीवर एक चांगलं समजाकार्य केलं आहे. त्या कामाचं कौतुक झालं पाहिजे,” असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
मात्र, कोणीही चांगलं काम केलं तर त्याचं कौतुक झालंच पाहिजे. सोनू सूद यांच्यावर अन्याय होऊ नये म्हणून सांगतो की, सूद यांनी स्वत:च्या हिंमतीवर काम केले आहे. आम्ही जलयुक्त शिवारचे काम करायचो तेव्हा ‘नाम’ संस्था आणि आमीर खान हे पण काम करायचे. तेव्हा आम्ही हेवादावा केला नाही. उलट त्यांना अधिक मदत कशी करता येईल हे बघितले. कारण ते सरकारच्या कामात मदत करत होते. त्यामुळे सोनू सूद यांच्या कामाचे स्वागत झाले पाहिजे, असे फडणवीस यांनी म्हटले.
News English Summary: If anyone does a good job, that work should be appreciated. It was said that Sonu Sood has done a good job and he belongs to BJP. Shiv Sena seems to have a firm belief that those who are doing a good job are in BJP. We are happy for this and thank them.
News English Title: Corona virus Lockdown Bjp Devendra Fadanvis On Shivsena Sonu Sood News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News