23 November 2024 3:28 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Railway Ticket Booking | 90% रेल्वे प्रवाशांना माहित नाही, असं मिळेल रेल्वेचं सर्वांत स्वस्त तिकीट, ठाऊक आहे हा फंडा My EPF Money | EPF मधून पैसे काढण्याची सर्वांत सोपी पद्धत इथे पहा, खात्यातील जमा शिल्लक तपासून पैसे काढू शकता Credit Score | पगारदारांनो, तुमचा क्रेडिट स्कोर 750 असून सुद्धा लोन मिळणार नाही, जाणून घ्या नेमके कारण काय असेल Mutual Fund SIP | श्रीमंतीचा महामार्ग, 'या' भन्नाट फॉर्म्युल्याचा वापर करा, तुमचा मुलगा देखील 21 व्या वर्षी बनेल करोडपती HAL Share Price | डिफेन्स कंपनी HAL सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, स्टॉक रेटिंग सह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HAL Smart Investment | श्रीमंतीच्या मार्गावर घेऊन जाणारा फॉर्म्युला आहे जबरदस्त; व्हाल 2 करोडचे मालक, खास इन्वेस्टमेंट टीप
x

Unlock महाराष्ट्र सरकारची चिंता वाढवणार, आज २२५९ नवे कोरोना रुग्ण

Maharashtra, Unlock, Covid 19, Corona Virus

मुंबई ९ जून: अनलॉक नंतर वर्दळ वाढल्याने आता महाराष्ट्राची चिंता वाढली आहे. महाराष्ट्रात २२५९ नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील करोना रुग्णांची संख्या ९० हजार ७८७ झाली आहे. आत्तापर्यंत ४२ हजार ६३८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर ४४ हजार८४९ रुग्ण सध्याच्या घडीला ऍक्टिव्ह आहेत. मागील २४ तासांमध्ये १२० मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात आत्तापर्यंत करोनाची बाधा होऊन मृत्यू झालेल्यांची संख्या ३ हजार २८९ झाली आहे. महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

तर पुण्यात लॉकडाऊन संपल्यानंतर कोरोनाचा व्हायरस आता ग्रीनझोनमधील झोपडपट्ट्यांमधून मोठ्या झपाट्याने पसरत असल्याचं आढळून आलं आहे. खासकरून सिंहगड रोडवरील पाणमळा आणि जनता वसाहतीमध्ये तर कोरोना रूग्णांची संख्या साडेतीनशेच्यावर पोहोचलीय त्यामुळे पालिकेनं हा परिसर पत्रे ठोकून सील करून टाकला आहे. गेल्या काही दिवसांपासून मिळत असलेली सुट आणि अनलॉक नंतर मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढली आहे. त्याचा परिणाम म्हणून संख्या वाढत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

या भागातले रहिवासी कॅनॉलच्या पाईपवरून धोकादायक पद्धतीने येजा करत असल्याने अपघाताचाही धोका वाढला आहे. पुणे शहरात रुग्णांचा संख्या वाढत असतानाच हे नवे हॉटस्पॉट तयार होत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.

 

News English Summary: Maharashtra’s worries have increased after the unlock. Even today, more than two thousand or 2259 patients were found in the state. This brings the total number of patients in the state to 90787.

News English Title: Maharashtra after the unlock more than two thousand or 2259 patients were found in the state News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x