28 April 2025 8:32 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
e Filing Income Tax | पगारदारांनो, नवीन टॅक्स प्रणालीमध्ये 75000 रुपयांची स्टॅंडर्ड डिडक्शन मिळणार नाही? मोठी अपडेट LIC Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा या सरकारी फंडात, अनेक पटीने पैसा परतावा मिळतोय, सेव्ह करून ठेवा EPFO Passbook | खाजगी कंपनी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, EPF प्रक्रियेत मोठे बदल, हक्काच्या पैशाबाबत अपडेट Horoscope Today | 28 एप्रिल 2025, तुमच्यासाठी सोमवारचा दिवस कसा असेल? तुमचे सोमवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार सोमवार 28 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Mishtann Foods Share Price | पेनी स्टॉक 52-आठवड्यांच्या जवळ पोहोचला, तज्ज्ञांनी कोणते संकेत दिले - BOM: 539594 GTL Share Price | पेनी स्टॉकने लोअर सर्किट हिट केला, हा स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: GTLINFRA
x

....अन्यथा पुन्हा लॉकडाउन करावा लागू शकतो, मुख्यमंत्र्यांचा इशारा

CM Uddhav Thackeray, Lockdown, Unlock

मुंबई, १० जून: राज्य सरकारने ‘मिशन बिगिन अगेन’ अंतर्गत लॉकडाउन शिथील करण्यास सुरुवात केली आहे. राज्य सरकारने दुकानं, गार्डन यांच्यासाठी वेळेची मर्यादा देत सुरु करण्याची परवानगी दिली असून खासगी कार्यालयांनाही ठराविक मनुष्यबळासोबत काम करण्यास संमती दिली आहे. त्यामुळे ३० जून नंतर लॉकडाउन पूर्णपणे उठवला जाणार का ? असा प्रश्न विचारला जात आहे. यासंबंधी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जर शिथीलता जीवघेणी ठरत आहे असं वाटलं तर आपल्याला पुन्हा लॉकडाउन करावा लागू शकतो असा इशारा दिला आहे. निसर्ग वादळामुळे फटका बसलेल्या कोकणासाठी मदत जाहीर करण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

आपल्याला कोरोनासोबत अतिशय सावध राहून जगावं लागणार आहे. त्यामुळेच सरकार अतिशय सावधपणे पावलं टाकत आहे. आपण कोणतीही घाई करत नाही. टप्प्याटप्प्यानं आपण लॉकडाऊन लागू केला. आता टप्प्याटप्प्यानं आपण निर्बंध शिथिल करत आहोत. सकाळी व्यायाम करण्यासाठी, फिरण्यासाठी सवलत दिली आहे. मात्र ही सवलत देताच रस्त्यांवर गर्दी झाली. ही गर्दी टाळायला हवी. जर लोकांनी गर्दी करणं कमी केलं नाही, जी शिथिलता आहे त्यातून नुकसान होत आहे हे लक्षात आलं तर नाइलाजाने पुन्हा कठोर लॉकडाऊन करावा लागेल, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला.

“करोनासोबत जगायला शिका असं जगभरात सांगितलं जात आहे. सरकारने निर्बंध शिथील केल्यानंतर जी काही झुंबड उडाली ती पाहून थोडी धाकधूक वाटली. आरोग्यासाठी व्यायाम करायला मिळावा यासाठी बाहेर पडायची परवानगी दिली आहे. आरोग्य खराब कऱण्यासाठी नाही. आपण एकमेकांपासून अंतर ठेवलं पाहिजे,” असं उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितलं.

 

News English Summary: So will the lockdown be fully lifted after June 30? Such a question is being asked. Speaking on the occasion, Chief Minister Uddhav Thackeray has warned that if slackness seems to be fatal, we may have to lockdown again.

News English Title: Corona virus Lockdown Shivsena Cm Uddhav Thackeray On Lockdown Extension News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या