22 November 2024 7:29 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ९४ हजार ४१ वर

Maharashtra, Mumbai, Corona Virus, Covid 19

मुंबई, ११ जून : महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसागणिक वाढतेय. काल एका दिवसात तब्बल 3 हजार 254 नवीन रुग्णांनी नोंद झाल्याने राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 94 हजार 41 वर पोहोचली आहे. यापैकी 44 हजार 517 रुग्ण आतापर्यंत कोरोनामुक्त झाले असून 46 हजार 74 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच काल 149 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने राज्यातील कोरोनाबळींची संख्या 3 हजार 438 वर पोहोचली आहे.

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. मुंबईत काल दिवसभरात 1 हजार 567 नवीन रुग्ण आढळून आले असून 97 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 52 हजार 667 वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत 1 हजार 857 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

दरम्यान, मुंबई, अहमदाबाद, चेन्नई, कोलकाता, दिल्ली आणि बेंगळूरु या सहा शहरांमध्ये केंद्रीय पथके तैनात करण्यात आली आहेत. आठवडाभर ही पथके संबंधित शहरांमधील आरोग्याच्या सुविधांचा आढावा घेऊन दररोज राज्याच्या आरोग्य मंत्रालयाला तसेच केंद्र सरकारला अहवाल सादर करतील. या भेटीनंतर संपूर्ण अहवाल केंद्राला सादर केला जाईल. १५ राज्यांमध्ये ५० केंद्रीय पथके पाठवण्यात येणार असून, महाराष्ट्रात मुंबई, पुणे, ठाणे, औरंगाबाद, कोल्हापूर, पालघर आणि सोलापूर या शहरांना केंद्रीय पथके भेट देणार आहेत.

News English Summary: The number of corona positive patients in Maharashtra has increased to 94041. In the last 24 hours, 3438 new cases have been reported in Maharashtra. There have been 149 deaths in the last 24 hours at Corona in Maharashtra.

News English Title: The number of corona positive patients in Maharashtra has increased to 94041 News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x