22 November 2024 10:49 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO
x

केंद्राची दुर्गम भागात मदत पोहोचत नाही, पण भाजपच्या प्रचाराचे LED पोहोचतात

Villagers Listening, Amit Shah, On Led Screen Affixed, Bamboo Shrub

कलकत्ता, ११ जून: देशावर करोनाचं संकट ओढवलं आहे. तर दुसरीकडे काही राज्यातील विधानसभा निवडणुकाही जवळ येऊ लागल्या आहेत. बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये लवकरच निवडणुका होणार आहेत. बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी व्हर्च्युअल रॅलीतून प्रचाराचा बिगुल फुंकला. आउटलूकनं सूत्रांच्या माहितीवरून दिलेल्या वृत्तानुसार शाह यांच्या या व्हर्च्युअल रॅलीसाठी भाजपानं तब्बल १०,००० मोठ्या एलईडी स्क्रीन बसवल्या होत्या. तर संपूर्ण राज्यात ५०,००० अधिक स्मार्ट टिव्हींची व्यवस्था करण्यात आली होती.

दरम्यान भाजपाच्या पहिल्या व्हर्च्युअल रॅलीवर झालेल्या खर्चावरून राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी मोठा आरोप केला होता. “प्रसारासाठी एका एलइडीचा खर्च सरासरी २०,००० इतका आहे. रॅलीमध्ये ७२ हजार एलईडी स्क्रीन लावण्यात आल्या होत्या म्हणजे तब्बल १४४ कोटी रूपये फक्त एलईडी स्क्रीनवर खर्च करण्यात आले. श्रमिक एक्स्प्रेसच्या भाड्यापोटी झालेले ६०० कोटी देण्यासाठी ना सरकार समोर आलं, ना भाजपा. यांची प्राथमिकता गरीब नाही, तर निवडणूक आहे,” असा आरोप तेजस्वी यादव यांनी केला होता.

त्यानंतर पश्चिम बंगालमधील एक फोटो सध्या व्हायरल होत आहे. या फोटोत ग्रामस्थ बांबूच्या बेटावर लावलेल्या टीव्हीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं भाषण ऐकत असताना दिसत आहे. एकीकडे पश्चिम बंगाल अम्फान वादळातून सावरण्याचा प्रयत्न करत असताना आणि दुसरीकडे देशभरात करोनाने थैमान घातलं असतानाच हा फोटो समोर आल्याने ट्विटरवर अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

एनडीटीव्हीने दिलेल्या माहितीनुसार, भाजपाने अमित शाह यांच्या व्हर्च्युअल रॅलीसाठी पश्चिम बंगालमध्ये ७० हजार फ्लॅट स्क्रीन टीव्ही तर १५ हजार मोठ्या एलईडी स्क्रीन लावल्या होत्या. या रॅलीच्या माध्यमातून भाजपाने पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुकलं असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. राज्यात जवळपास ७८ हजार मतदान केंद्र आहेत.

भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस बीएल संतोष यांनी हा फोटो ट्विट केला आहे. “ग्रामीण भागातील लोक अमित शाह यांचं भाषण ऐकत आहेत. गेल्या पाच वर्षात मेहनत करुन भाजपा इथपर्यंत पोहोचली आहे. लोकांना अच्छे दिन हवे आहेत,” असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

 

News English Summary: A photo from West Bengal is currently going viral. This photo shows a villager listening to Union Home Minister Amit Shah’s speech on a TV set on a bamboo island.

News English Title: Villagers Listening To Union Home minister Amit Shah On Led Screen Affixed To A Bamboo Shrub Is Viral News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Amit Shah(265)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x