22 November 2024 1:40 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

खासगी लॅबमध्ये ३५ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह, NIV'कडून निगेटिव्ह असल्याचं उघड

Wrong Covid 19, Test results 35, Noida, Quarantine ward

नवी दिल्ली ११ जून: देशात कोरोनाचे रुग्ण दररोज वाढत आहेत. या रुग्णवाढीचा प्रचंड ताण आरोग्य व्यवस्थेवर पडत आहे. त्यामुळे देशभरात कोरोना टेस्टसाठी खासगी लॅब्सना परवानगी देण्यात आली. मात्र या लॅब्सचा लुटारूपणा उघड होत आहे. दिल्ली जवळच्या नोएडामध्ये तर एका खासगी लॅबने ३५ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह दिला. मात्र ते सर्व जण निगेटिव्ह असल्याचं स्पष्ट झालं. मात्र तोपर्यंत त्या सगळ्यांना तीन दिवस कॉरंन्टाइन सेंटरमध्ये काढावे लागले. NDTVने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

या सर्व जणांना ताप, थंडी, कफ, सर्दी अशी लक्षणे होती. ते सर्व जण खासगी डॉक्टरांकडे गेले होते. त्यांनी त्या सगळ्यांना कोविड-19ची चाचणी करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर त्या सगळ्यांनी चाचणी केली ती पॉझिटिव्ह असल्याचं सांगण्यात आलं. त्या सगळ्यांचे सॅम्पल्स जेव्हा National Institute of Virology ला पाठविण्यात आले ते सगळे निगेटिव्ह आले आहेत. पण तोपर्यंत त्या सगळ्यांना तीन दिवस कॉरंन्टाइन सेंटरला ठेवण्यात आलं होतं. आणि मानसिक त्रास झाला तो वेगळाच.

दुसरीकडे मुंबईत थायरोकेअर रुग्णालयाने केवळ दोन हजार रुपयांत करोना टेस्ट करण्याचा प्रस्ताव महापालिकेला सादर केला आहे. तसं पत्रंही थारोकेअरने पालिकेला लिहिलं आहे. विशेष म्हणजे करोना तपासणीतील निदानातील चुकांबाबत याच थायरोकेअर हॉस्पिटलवर दंडात्मक कारवाई करण्यात आली होती.

मुंबई महापालिकेने घेतलेल्या प्रत्येक स्वॅब नमुन्याची तपासणी करण्यासाठी आम्ही केवळ दोन हजार रुपये आकारू. जर आमच्या टेक्निशियनने हे सँपल घेतले तर प्रती तपासणीमागे २५०० रुपये आकारण्यात येईल, असं थायरोकेअरने पालिकेला लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. मुंबईतील प्रत्येक खासगी लॅबमध्ये करोना चाचणीसाठी वेगवेगळे शुल्क आकारले जाते. सार्वजनिक लॅबमध्ये करोना टेस्ट मोफत आहे. तर खासगी प्रयोगशाळेत किमान ४५०० रुपये आकारले जात आहेत.

 

News English Summary: Private labs were allowed for corona tests across the country. However, the looting of these labs is being exposed. In Noida, near Delhi, a private lab reported 35 people positive. However, it became clear that they were all negative. But until then, they all had to be taken to the quarantine center for three days. NDTV has reported about this.

News English Title: Wrong Covid 19 test results 35 from Noida in quarantine ward for 3 days News latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x