22 November 2024 2:00 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

३ महिने कर्जाचा हप्ता भरु नका सांगता, मग व्याज कसे काय घेता? - सुप्रीम कोर्ट

Lockdown, Supreme Court of India, RBI

नवी दिल्ली, १२ जून: देशात कोरोनाचे संकट असल्याने लॉकडाऊन जारी करण्यात आले आहे. या लॉकडाऊनमुळे अनेक उद्योगधंदे बंद आहे. तर अनेकांच्या हाताला काम नाही. त्यामुळे सर्वसामान्यांना कर्जाचे हप्ते कसे भरायचे, असा प्रश्न पडला होता. यावेळी सरकारकडून दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसे RBI ला निर्देश देण्यात आले. त्यानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) कर्जाचे हफ्ते ३१ ऑगस्टपर्यंत न भरण्याची मुभा दिली आहे. मात्र, हे करताना व्याज आकरण्याचा निर्णय बँकांनी कायम ठेवला. याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. यावर सुनावणी सुरु असताना न्यायालयाने तीन महिने कर्जाचा हप्ता भरु नका सांगता आणि व्याज घेता, हे कसे काय, असा सवाल उपस्थित केला. आता पुढील सुनावणी १७ जून रोजी होणार आहे.

न्यायमूर्ती जे अशोक भुषण यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली. याचिकेत बँकांनी हफ्ते माफ करण्यात आलेल्या काळात व्याजदेखील माफ करावं अशी मागणी करण्यात आली आहे. न्यायमूर्ती जे अशोक भुषण यांनी सुनावणीवेळी विचारणा केली की, जर तुम्ही तीन महिन्यांसाठी कर्ज माफ केलं आहे तर मग तुम्ही त्यावर व्याज कसं काय लावू शकता ही आमची मुख्य काळजी आहे.

न्यायमूर्तींनी सुनावणीवेळी विचारणा केली की, जर तुम्ही तीन महिन्यांसाठी कर्ज माफ केले आहे तर मग तुम्ही त्यावर व्याज कसे काय घेऊ शकता, असा सवाल उपस्थित केला. ही आमची काळजी आहे. यावेळी सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी यावेळी आपल्याला यासंबंधी आरबीआयच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन चर्चा करावी लागेल असे सांगितले. एसबीआयच्यावतीने न्यायालयात बाजू मांडणारे वरिष्ठ वकील रोहतगी यांनीही आरबीआयशी चर्चा करणे महत्त्वाचे असल्याचे यावेळी सांगितले. त्यानंतर न्यायालयाने १७ जूनपर्यंत सुनावणी पुढे ढकलली आहे.

 

News English Summary: A petition was filed in the Supreme Court against this. At the start of the hearing, the court raised the question of not paying the loan installment for three months and charging interest. The next hearing is set for June 17.

News English Title: Lockdown Supreme Court on seeking waiver of interest on loan moratorium provided by RBI News Latest Updates.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x