22 November 2024 5:07 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम Smart Investment | शेअर बाजारातील गुंतवणूक समजत नाही; चिंता नको, गुंतवणुकीचे 'हे' पर्याय देतात बक्कळ पैसे - Marathi News Aadhar ATM Facility | ATM मध्ये न जाता पैसे कसे काढायचे ठाऊक आहे का; पहा आधार ATM ची कमाल, घरबसल्या मिळतील पैसे Tata Power Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAPOWER Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
x

राज्यात ३४९३ नवे कोरोनाबाधित, १२७ मृत्यू, एकूण रुग्ण आकडा १ लाखाच्या पार

Maharashtra, Covid 19, Corona Virus

मुंबई १२ जून: राज्याला कोरोना व्हायरसचे हादरे सुरुच आहेत. आजही राज्यात ३४९३ नवे रुग्ण सापडले. त्यामुळे राज्याचा एकूण आकडा १ लाख १ हजार १४१ वर गेला आहे. तर राज्यात गेल्या २४ तासांमध्ये १२७ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे एकूण मृत्यूची संख्या ३७१७ वर गेली आहे. आजही मुंबईत सगळ्यात जास्त ९० जणांचा मृत्यू झाला. दिवसभरात १७१८ रुग्ण बरे झाले. तर राज्यात एकूण ४७७९६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे ४७.३ एवढं असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

सध्या राज्यात ५ लाख ७९ हजार ५६९ लोक होम क्वारंटाइन आहेत. तर २८ हजार २०० लोक संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. मागील २४ तासांमध्ये १२७ करोना रुग्णांचा मृत्यूंची नोंद झाली. यामध्ये ९२ पुरुष तर ३५ महिला होत्या. आज नोंदवण्यात आलेल्या १२७ मृत्यूंपैकी ६० वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाचे ६७ रुग्ण होते. तर ५२ रुग्णांचे वय हे ४० ते ५९ या वयोगटातील होते. ४० वर्षांखालील ८ रुग्ण होते. १२७ पैकी ८९ रुग्णांमध्ये मधुमेह, उच्चरक्तदाब, हृदयरोग असे जोखमीचे आजार होते. कोविड १९ मुळे राज्यात मृत्यूंची ३७१७ इतकी झाली आहे.

 

News English Summary: The state continues to be hit by the corona virus. Even today, 3493 new patients were found in the state. Therefore, the total number of the state has gone up to 1 lakh 1 thousand 141. So far 127 people have died in the state in the last 24 hours. So the total number of deaths has gone up to 3717.

News English Title: The Total Number Of Covid19 Positive Cases In Maharashtra Crosses 1 Lakh Today News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x