HCQ सोबत अॅझिथ्रोमायसिन या औषधाच्या वापरामध्ये बदल होण्याची शक्यता
नवी दिल्ली, १३ जून: कोरोनाबाधितांवर प्राथमिक उपचार करताना हायड्रोक्सीक्लोरोक्वीन आणि अॅझीथ्रोमायसीन या गोळयांचा वापर केला जातो. कोरोनाची सौम्य तसंच कुठलीही लक्षणे नसलेल्या रुग्णांवर या औषधांचा वापर प्रभावी ठरल्याचं आतापर्यंत दिसून आलं आहे. मात्र, लवकरच या औषधाच्या वापरामध्ये बदल होऊ शकतो. कोरोनाच्या गंभीर रुग्णांवर अॅझीथ्रोमायसीनच्या वापरासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालय लवकरच सुधारित मार्गदर्शतत्वे जारी करणार असल्याची शक्यता आहे.
कोरोनाच्या ट्रीटमेंट प्रोटोकॉलशी संबंधित एका सूत्राने याबाबतची पुष्टी केली की, 10 जून रोजी जाहीर झालेल्या ट्रीटमेंट प्रोटोकॉलमध्ये अॅझिथ्रोमायसिनचे एचसीक्यूसोबत वापर करण्याचा उल्लेख केला नाही. यापूर्वी आयसीएमआरने अशी शिफारस केली होती की, कोरोनावरील उपचारांसाठी एचसीक्यूसह अॅझिथ्रोमायसिन देखील दिले जाऊ शकते.
एम्सच्या मेडिसिन विभागाचे प्रमुख आणि क्लिनिकल रिसर्चवर असलेले नॅशनल टास्क फोर्सचे सदस्य डॉ. नवीत विग यांनी याबाबत सांगितले, “कोरोना संक्रमित सौम्य रूग्ण किंवा गंभीर रूग्ण असोत, सर्वात मोठा घटक म्हणजे ऑक्सिजनेशन आहे, कोरोना विषाणूच्या उपचारातील अँटीव्हायरल औषधे जास्त प्रभावी असल्याचे सिद्ध होत नाही. उपचार प्रक्रिया हळूहळू बदलली आहे. पूर्वी अॅझिथ्रोमायसिन आणि एचसीक्यू देण्यात आले होते. मात्र, आता आम्ही संशोधनानंतर या निष्कर्षापर्यंत पोहोचलो आहोत की, अॅझिथ्रोमायसिनची आवश्यकता नाही आहे.”
दिल्लीतील एम्सनेही या नव्या नियमाचं पालन करण्यास सुरवात केली आहे. दिल्लीतील एम्स रुग्णालय कोरोना रुग्णांवर नव्या प्रोटोकॉलनुसार उपचार करत आहे. उपचारांची नवीन मार्गदर्शतत्वे लवकरच सार्वजनिक केली जाणार आहेत. कोरोनावरील उपचारामध्ये एचसीक्यू गोळीचा वापर कायम राहिल पण अॅझीथ्रोमायसीनच्या जागी दुसरं औषध दिलं जाऊ शकतं.
News English Summary: Hydroxychloroquine and Azithromycin tablets are used in the primary treatment of coronary heart disease. So far, the drug has been shown to be effective in patients with mild coronary heart disease and no symptoms. However, the use of this drug may change soon.
News English Title: Health ministry rollback use of Azithromycin treat covid19 Hydroxychloroquine corona virus ICMR News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Loan EMI Payment | तुम्ही सुद्धा EMI भरायला विसरता, तुमच्या एका चुकीमुळे होईल प्रचंड नुकसान, संपूर्ण डिटेल्स वाचा - Marathi News
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- NTPC Share Price | मल्टिबॅगर एनटीपीसी शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPC
- Mutual Fund SIP | गुंतवणुकीचा जबरदस्त फॉर्मुला, झपाट्याने पैसा वाढवा, करोडमध्ये मिळेल परतावा, फायदा घ्या - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, पुन्हा मोठी कमाई होणार - NSE: TATAMOTORS