22 November 2024 11:43 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839
x

मोदींच्या आर्थिक सल्लागार आशिमा गोयल यांच्याकडून आत्मनिर्भर पॅकेजवर प्रश्नचिन्ह

Atmanirbhar Bharat, Ashima Goyal

नवी दिल्ली, १४ जून: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वावलंबी भारत अभियानाची घोषणा करताना त्यासाठी २० लाख कोटींच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली आहे. नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेशी संवाद साधत या पॅकेजची घोषणा केली होती. नरेंद्र मोदींनी सांगितलं होते की, “हे पॅकेज स्वावलंबी भारत अभियानाचा महत्त्वाचा भाग आहे. आतापर्यंत जाहीर करण्यात आलेली आर्थिक मदत आणि हे पॅकेज एकत्र मिळून २० लाख कोटींचं आहे. २०२० मध्ये जाहीर करण्यात आलेलं हे २० कोटींचं पॅकेज स्वावलंबी योजनेला नवी गती देईल”. हे पॅकेज जीडीपीच्या १० टक्के असल्याचंही नरेंद्र मोदींनी यावेळी सांगितलं होतं.

भारत जेव्हा स्वावलंबी होण्याची गोष्ट करतो, तेव्हा त्याची वकीली करत नाही. जी संस्कृती जगाचा विकास करू इच्छिते. जगाला घर मानते. भारताच्या कामाचा प्रभाव जगाच्या कल्याणावर पडतो. टीबी असेल, हागणदारी मुक्ती असेल जगावर त्याचा परिणाम झाला आहे. तणावातून मुक्ती देण्यासाठी भारताकडून जगाला भेट मिळाली आहे. जगाला विश्वास वाटू लागला आहे, भारत काही चांगले करू शकतो. पण प्रश्न आहे कसा? यावर उत्तर आहे १३५ कोटी लोकांनी केलेला स्वावलंबीपणाचा संकल्प यावर उत्तर आहे, असे मोदी म्हणाले होते.

या पॅकेजबाबतची विस्तृत माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारमण दिली होती. मात्र, या पॅकेजवर विविध स्तरांतून टीका होत आहे. यातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आर्थिक सल्लागार परिषद सदस्य आशिमा गोयल यांनीही या आत्मनिर्भर पॅकेजवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. तसेच, या पॅकेजमध्ये आणखी सुधारणा केली जाऊ शकते, असे त्यांनी म्हटले आहे.

‘पीएचडी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री’च्या एका व्हर्च्युअल बैठकीत आशिमा गोयल बोलत होत्या. यावेळी अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने मागणीला प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचे सांगितले. ‘आर्थिक पॅकेज परिपूर्ण नाही. पॅकेजमध्ये अनेक त्रुटी आहेत. त्या दूर करून या पॅकेजमध्ये आणखी सुधारणा करता येऊ शकते’, असे आशिमा गोयल यांनी म्हटले आहे.

 

News English Summary: The Atmanirbhar Bharat package is being criticized from various levels. Ashima Goyal, now a member of Prime Minister Narendra Modi’s Economic Advisory Council, has also questioned the self-reliance package. Also, further improvements can be made to this package, he said.

News English Title: Ashima Goyal a member of Prime Minister Narendra Modi Economic Advisory Council has also questioned the Atmanirbhar Bharat package News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x