25 November 2024 2:45 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेतलंय का, लवकरात लवकर लोन फेडण्याची टेकनिक आहे कमालीची - Marathi News SIP Vs Post Office | SIP की पोस्ट ऑफिस RD, कोणती गुंतवणूक तुम्हाला बनवेल लखपती, फायदा लक्षात घ्या - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Smart Investment | केवळ 150 रुपये वाचवून आपल्या मुलाचं भविष्य सुरक्षित करा, पैसे बचतीतून होईल लाखोंची कमाई Post Office MIS | पोस्टाची भन्नाट योजना; प्रत्येक महिन्याला कमवाल 9,250 रुपये, जाणून घ्या पोस्टाच्या योजनेचे फायदे - Marathi News Business Idea | कमाईचे साधन शोधत आहात; मग या 3 बिझनेस टिप्स खास तुमच्यासाठी, जोमाने होईल 12 महिने कमाई - Marathi News NTPC Share Price | एनटीपीसी शेअरसाठी 'आउटपरफॉर्म' रेटिंग, रॉकेट होणार शेअर, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPC
x

केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी मुंबईची लाईफलाईन रुळावर येणार

Western Railway, Central Railway, Unlock, essential staff

मुंबई, १५ जून : एवढ्या दिवसांच्या विश्रांतीनंतर मुंबई लोकल सोमवारपासून धावणार आहे. पण लोकल ट्रेन फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सुरू होणार आहे. रेल्वेकडून रविवारी रात्री उशिरा अधिकृत माहिती देण्यात आली. पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावर लोकल धावणार आहेत.

रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, जवळपास १.२५ लाख अत्यावश्यक कर्मचारी या लोकलमधून प्रवास करण्याची शक्यता आहे. या प्रवाशांनी तिकीट खिडकीत शासकीय ओळखपत्र दाखवल्यास त्यांना तिकीट मिळू शकते. तसेच पासधारक तिकिटांची वैधता वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर राज्य शासनाने दिलेल्या माहितीनुसार, केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना आयडी कार्डच्या माध्यमातून स्थानकांवर प्रवेश दिला जाईल. यानंतर त्यांना क्यूआर कोड आधारित ई-पास दिले जातील. महत्त्वाचे म्हणजे जे कर्मचारी वैद्यकीय दृष्ट्या सुदृढ आहेत त्यांनाच लोकलमधून प्रवास करता येणार आहे.

पश्चिम रेल्वे:

  • पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, १५ जून २०२० पासून ही सेवा सुरू होणार आहे. पश्चिम रेल्वेच्या माध्यमातून ७३ फेऱ्या होणार आहेत. यातील ८ फेर्या या विवार आणि
  • डहाणू मार्गे धावणार आहे. या रेल्वेतून फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच परवानगी देण्यात येणार आहे.
  • या लोकल सकाळी ५.३० ते रात्री ११.३०पर्यंत धावणार आहेत. यामध्ये १५ मिनिटांची विश्रांती घेतली जाईल.
  • महत्वाच्या फेऱ्या या चर्चगेट ते विरार या स्टेशनांमध्ये होणार आहे. पण काही लोकल मात्र डहाणूवरून ही धावतील.
  • या लोकल सेवा पश्चिम मार्गावर जलद गतीने धावतील. चर्चगेट ते बोरिवली अशी जलद लोकल असे ती लोकल बोरिवलीच्या पुढे धीम्या गतीने धावेल.

 

News English Summary: Western Railway and Central Railway have decided to resume their selected suburban services for essential staff. These special suburban services will not be for general public but strictly for essential staff as identified by the State Government of Maharashtra.

News English Title: Western Railway and Central Railway have decided to resume their selected suburban services for essential staff News Latest Updates.

हॅशटॅग्स

#railway(18)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x