जून-जुलै नव्हे तर नोव्हेंबरमध्ये कोरोना उत्पात माजवणार - ICMR चा अंदाज
नवी दिल्ली, १५ जून: देशात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेला लॉकडाउन हळूहळू शिथिल करण्यात येत असला, तरी कोरोनाचं संकट अजूनही कायम आहे. नोव्हेंबर महिन्याच्या मध्यावधीमध्ये देशातील कोरोना रुग्णांची संख्या उच्चांक गाठण्याची शक्यता आहे. त्यामुळे देशात आयसीयू बेड व व्हेटिंलेटर्सचा तुटवडा जाणवू शकतो. भारतीय संशोधन परिषदेनं (आयसीएमआर) एका अभ्यास गटाच्या माध्यमातून पाहणी केली, त्यातून ही गोष्ट समोर आली आहे.
एका अभ्यासामध्ये हा दावा करण्यात आला आहे. या वेळी देशातील हॉस्पिटलमध्ये आयसीयू बेड आणि व्हेंटिलेटरची कमतरता जाणवणार असल्याचा इशारा या संशोधकांनी दिला आहे. लॉकडाऊनमुळे हा कालावधी पुढे गेला असून आठ आठवड्यांचा फरक पडला आहे. नोव्हेंबरच्या मध्यावर कोरोना देशात खूप मोठा उद्रेक करणार असल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
हा दावा भारतीय आयुविज्ञान अनुसंशोधन परिषदेने गठन केलेल्या ऑपरेशन रिसर्च ग्रुपच्या संशोधकांनी केला आहे. यामध्ये लॉकडाऊनचे फायदे सांगण्यात आले आहेत. लॉकडाऊनमुळे कोरोनाचा उद्रेक 34 ते 76 दिवस पुढे गेला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. लॉकडाऊनने संभाव्य कोरोना रुग्णांची संख्या 69 ते 97 टक्क्यांनी कमी केली. या काळात आरोग्य सुविधा सुधारण्यास मदत मिळाली. मात्र, आता लॉकडाऊन उठविण्यात आला आहे. यामुळे नोव्हेंबरमध्ये म्हणजेच 5.4 महिन्यांसाठी आयसोलेशन बेड, 4.6 महिन्य़ांसाठी आयसीयू बेड आणि 3.9 महिन्यांसाठी व्हेंटिलेटरचा तुटवडा जाणवू लागणार आहे. ‘पीटीयआय’नं याबाबत वृत्त दिलं आहे. देशातील करोनाच्या परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी आयसीएमआरनं संशोधकांचा समावेश असलेला ऑपरेशन रिसर्च ग्रुप स्थापन केला होता.
लॉकडाउननंतर करोना बाधित रुग्णांची संख्या वेगानं वाढायला लागली आहे. त्यात देशातील काही भागांमध्ये समूह संसर्ग झाल्याचा दावाही आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांकडून केला जात आहे. सरकारनं ही बाब स्वीकारली, तर लोक अधिक सावध होतील व काळजी घेतील, अशी सूचना वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ करत आहेत.
News English Summary: Although the lockdown imposed on the corona background in the country is slowly being relaxed, the corona crisis still persists. The number of corona patients in the country is expected to reach a peak in mid-November. Therefore, there is a shortage of ICU beds and ventilators in the country.
News English Title: The number of corona patients in the country is expected to reach a peak in mid November ICMR News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार