फेरपडताळणी: कोविड मृत्यूंची संख्या १३२८ ने वाढली, फडणवीस सरकारवर बरसले
मुंबई, १६ जून : कोरोनामुळे राज्यात नेमके किती मृत्यू झाले आहेत याची संख्या दडवण्यात येत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना केला होता. यासंबंधी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रही लिहिलं होतं. त्यानंतर २४ तासांच्या आत ठाकरे सरकारने फेरपडताळणी करत COVID-19 च्या मृत्यूंची वस्तुस्थिती सांगणारे आकडे जाहीर केले आहेत.
अखेर सत्य पुढे आलेच…!
मुंबईत 862 आणि अन्य जिल्ह्यांतील 466 कोरोना मृत्यू आज जाहीर करण्यात आले.
असे एकूण 1328 मृत्यू हे अधिकचे कोरोना मृत्यू म्हणून आता नोंदले जातील.#coronainmaharashtra pic.twitter.com/i1tkCa6fgy— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) June 16, 2020
या फेरपडताळणीत कोविड मृत्यूंची संख्या १३२८ ने वाढल्याचं दिसतं. ८६२ प्रकरणं मुंबई महानगर क्षेत्रातली आणि अन्य जिल्ह्यातले ४६६ प्रकरणं कोव्हिड मृत्यू म्हणून नोंदवण्यात आले आहेत. याची सविस्तर यादी राज्य सरकारने आता जाहीर केली आहे. या विषयावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की, “माझी राज्य सरकारला विनंती आहे की, या प्रक्रियेला आकड्यांच्या फेरपडताळणीचे गोंडस नाव न देता, गेले ३ महिने ही आकडेवारी लपविणार्यांवर काय कारवाई करणार, हे सांगितलं गेलं पाहिजे.”
माझी राज्य सरकारला विनंती आहे की या प्रक्रियेला आकड्यांच्या फेरपडताळणीचे गोंडस नाव न देता गेले तीन महिने ही आकडेवारी लपवणाऱ्यांवर काय कारवाई करणार हे सांगितले गेले पाहिजे. दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र पाठवून गेल्या तीन महिन्यांपासून काही कोरोनामृत्यू होऊन सुद्धा ते प्रत्यक्ष आकडेवारीत दाखविले जात नसल्याबद्दल तक्रार केली होती. आयसीएमआर आणि जागतिक आरोग्य संघटनेने कारोना बळी कसे नोंदवायचे, याचे स्पष्ट दिशानिर्देश दिले असल्याने ही कार्यकक्षा डेथ ऑडिट कमिटीची कशी काय होऊ शकते? ही समिती मृत्यूसंख्या कमी करण्यासाठी आहे की, मृत्यूसंख्या दडपण्यासाठी, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला होता. अखेर आज राज्य सरकारने हे 1328 मृत्यू अधिकचे असल्याचे मान्य केले आणि देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपांवर शिक्कामोर्तब झाले.
News English Summary: According to the re-examination, the number of Covid deaths has increased by 1328. 862 cases in Mumbai metropolitan area and 466 cases in other districts have been reported as covid deaths. The detailed list has now been released by the state government.
News English Title: According to the re-examination the number of Covid deaths has increased by 1328 News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार