22 November 2024 11:43 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839
x

गैरसमजांत राहू नये, चीनची लष्करी ताकद भारताच्या कितीतरी पटीने अधिक - ग्लोबल टाईम्स

China and India Military, Global Times

बीजिंग, १७ जून : लडाख सीमेवर भारत आणि चीन यांच्यात सुरू असलेला तणाव आता शिगेला पोहोचला आहे. भारतीय लष्कराने माहिती दिली की, गालवान खोऱ्या जवळ चिनी सैनिकांशी झालेल्या चकमकीत कमांडिंग ऑफिसरसह २० भारतीय जवान शहीद झाले आहेत. या संघर्षात चीनचं ही मोठं नुकसान झालं आहे. दोन्ही देशांमधील तणाव वाढला आहे. चीन सीमेवर शहीद झालेल्या २० जवानांची नावे आज सैन्य जाहीर करणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार चीनकडून सीमेच्या परिस्थितीत फारसा बदल झाला नाही.

संभाषणातून कोणताही तोडगा निघालेला नाही. आता केवळ लडाखच नाही तर संपूर्ण एलएसीवर अलर्ट जारी करण्यात आला आहे असं चीननं म्हटलं आहे. दरम्यान, भारतावरच फोडले आहे. चीनचे सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सने दोन्ही देशांदरम्यान वाढलेला तणाव हा भारतामुळेच झालेला आहे. भारतीय सैन्याचा घमेंडीपणा आणि दुस्साहसामुळे हे घडले आहे. सैन्यांमधील संघर्ष दोन्ही देशांसाठी योग्य नाहीय. आम्ही मोठ्या युद्धासाठी तयार असून त्याचा फायदाही आमच्याबाजुला आहे, असे म्हटले आहे.

ग्लोबल टाईम्सने संपादकीयमध्ये युद्धखोरीची भाषा केली आहे. सीमेरेषेवर भारतीय सेना इन्फ्रास्ट्रक्चर उभारत आहे. त्यांनी चीनच्या जागेतही काही बांधकाम केले आहे. यामुळे दोन्ही देशांमध्ये संघर्ष होत आहे. कारण चीनचे सैन्य भारतीयांना रोखण्याचा प्रयत्न करत आहे. गेल्या काही वर्षांपासून भारताने दोन गैसमज करून घेत सीमेच्या मुद्द्यावर कडक भूमिका घेतली आहे. यामध्ये पहिला अमेरिकेच्या वाढत्या दबावामुळे चीन भारतासोबत वाईट संबंध ठेवू इच्छित नाहीय. यामुळे चीन भारताने उकसावल्यास त्याला उत्तर देण्याची इच्छा ठेवत नाही.

दुसरा गैरसमज असा की काही लोकांना वाटते की, भारताच्या सैन्याची ताकद चीनपेक्षा जास्त आहे. या गैरसमजांमुळेच भारताच्या विचारांना प्रभावित केले आहे. पण चीन आणि भारताच्या तकदीमध्ये खूप अंतर आहे, असे ग्लोबल टाईम्सने म्हटले आहे.

 

News English Summary: Another misconception is that some people think that India’s military strength is greater than China’s. It is these misconceptions that have influenced India’s thinking. But there is a huge gap between the destinies of China and India, the Global Times said.

News English Title: There is a huge gap between the destinies of China and India Military said Global Times said News Latest Updatges.

हॅशटॅग्स

#China(26)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x