22 November 2024 12:27 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839
x

भारत-चीन वादावर आम्ही लक्ष ठेवून आहोत, अमेरिकेची प्रतिक्रिया

India China, America Reaction

वॉशिंग्टन , १७ जून : लडाख सीमेवर भारत आणि चीनच्या सैन्यांमध्ये हिंसक झडप निर्माण झाल्यानंतर आता आंतरराष्ट्रीय पातळीवर पडसाद उमटायला लागले आहेत. भारत-चीन वादात अमेरिकेनेही उडी घेतली आहे. आम्ही लडाख वादावर बारीक लक्ष ठेवून आहोत. त्यामुळे आता चीनची काय भूमिका असणार याकडे लक्ष लागले आहे. आधीच चीन आणि अमेरिकेत कोरोना विषाणू प्रादुर्भावानंतर जोरदार शीत युद्ध सुरु आहे. दरम्यान, लडाख हिंसक झडपेनंतर भारताचे २० जवान शहीद झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष दोन्ही देशांकडे लागले आहे. अमेरिकेच्या गृह विभागाने झालेल्या भारतीय जवानांबद्दल शोक व्यक्त केला आहे. तर, संयुक्त राष्ट्र संघानेही चिंता व्यक्त केली आहे.

तर भारत आणि चीनदरम्यानच्या तणावपूर्ण परिस्थितीवर अमेरिकेने आपली प्रतिक्रिया दिली आहे. अमेरिकेने म्हटले आहे, लडाख सीमेवर निर्माण झालेल्या तणावाच्या स्थितीवर आम्ही बारीक लक्ष ठेवून आहोत. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना अमेरिकन परराष्ट्र खात्याच्या प्रवक्त्याने म्हटले आहे, आम्ही प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील (एलएसी) भारत आणि चीनी सैन्यातील तणावाच्या स्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत. भारतीय लष्कराने मंगळवारी एक निवेदन जारी करून गलवान खोऱ्यात २० जवानांना हौतात्म्य आल्याचे सांगितले होते. आम्ही त्यांच्या कुटूंबियांप्रती शोक व्यक्त करतो.

भारत-चीन यांच्यातील तणाव कमी न होता अधिक वाढत गेला आहे. कालच्या घटनेनंतर चीनकडून पुन्हा रात्री घुसखोरी करण्याता आल्याचे वृत्त आहे. दरम्यान, रात्री गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये पुन्हा हिंसक झडप झाली. त्यावेळी एक नवीन घटना समोर आली आहे. यावेळी काही सैनिक नदी तसेच दरीत कोसळून शहीद झालेत. चीनी सैन्य पूर्ण तयारीत आले होते. त्यांच्यासोबत लोखंडाचे रॉड आणि काही तोडलेल्या काटेरी तारा होत्या, अशी माहिती मिळत आहे.

अमेरिकन परराष्ट्र खात्याच्या प्रवक्त्यांनी म्हटले होते, की भारत आणि चीन दोघांनीही डी-एस्कलेट करन्याची इच्छा व्यक्त केली आहे. तसेच आम्हीही सद्य स्थितीत शांततापूर्ण मार्गाचे समर्थन करतो. ते म्हणाले 2 जूनला फोनवरून राष्ट्रपती ट्रम्प आणि पीएम मोदी यांनी भारत-चीन सीमेवरील परिस्थितीवर चर्चा केली आहे.

 

News English Summary: A US State Department spokesman had said that both India and China had expressed a desire to de-escalate. We also support a peaceful path in the current situation. He said President Trump and PM Modi had discussed the situation on the Indo-China border over the phone on June 2.

News English Title: America first reaction on India China Ladakh clash we are watching News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Donald Trump(89)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x