VIDEO - चीनकडून भारताला थेट हायड्रोजन बॉम्बची भीती दाखवायला सुरुवात
नवी दिल्ली, १७ जून : लडाखमधील गलवान खोऱ्यामध्ये असणाऱ्या भागात १५-१६ जूनला रात्री भारत आणि china चीन या दोन्ही राष्ट्रांच्या सैन्यामध्ये हिंसक झडप झाली. हे स्वरुप इतकं हिंसक होतं की यामध्ये भारताचे २० जवान शहीद झाले. शेजारी राष्ट्राच्या अर्थात चीनच्या सैन्यातील जवळपास ४३ जवानांनाही यात प्राण गमवावे लागले. सीमावादाच्या या मुद्द्याला मिळालेलं चिंता वाढवणारं हे वळण पाहता चीननं कांगावा करण्यासही सुरुवात केली.
परिस्थितीचं गांभीर्य पाहता इथं भारतात चर्चा आणि बैठकांच्या सत्रांना वेग आला. अखेर India-China Clash आणि violent face off नंतर चीनचे परराष्ट्र मंत्री आणि भारताचे परराष्ट्र मंत्री यांच्यात उच्चस्तरिय चर्चा झाली. ज्यामध्ये भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी परखडपणे देशाची भूमिका मांडली.
गलवानमध्ये जे काही घडलं ते पूर्वनियोजित आणि साचेबद्ध पद्धतीनं घडवून आणण्यात आलं होतं. ज्याचे परिणाम म्हणजे या सर्व घटना आहेत, असं जयशंकर यांनी चीनला खडसावलं. दोन्ही देशांनी चीनचे पचर्चेच्या मार्गानं या वादावर तोडगा काढण्यास सहमती दर्शवली असली तरीही भारताकडून तीव्र शब्दात नाराजी मात्र स्पष्टपणे व्यक्त करण्यात आली.
दरम्यान, चीनने भारताला आता थेट हायड्रोजन बॉम्बची भीती दाखवायला सुरुवात केली आहे. जगात शांततेचे ढोंग करणाऱ्या चीनचे सरकारी वृत्तपत्र असलेल्या ग्लोबल टाइम्सने 1967मध्ये हायड्रोजन बॉम्बच्या परीक्षणाचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. याच बरोबर, हा हायड्रोजन बॉम्ब स्वसंरक्षणासाठी असून आपला देश अण्वस्त्रांचा प्रथम वापर करणार नाही, या सिद्धांतावर कायम असल्याचे म्हटले आहे.
#OnThisDay in 1967, China successfully detonated its first hydrogen bomb. China staunchly pursues a nuclear strategy of self-defense and is committed to the principle of non-first-use of #nuclear weapons. pic.twitter.com/jGiES6CxqT
— Global Times (@globaltimesnews) June 17, 2020
ग्लोबल टाइम्सने लिहिले आहे, ‘आजच्याच दिवशी 1967मध्ये चीनने आपल्या पहिल्या हायड्रोजन बॉम्बची यशस्वी चाचणी केली होती. चीन निष्ठापूर्वक स्वसंरक्षणासाठी अण्वस्त्र धोरण राबवित आहे आणि अण्वस्त्रांचा प्रथम वापर न करण्याच्या सिद्धांतावर कायम आहे. चीनच्या सरकारी वृत्तपत्राने हायड्रोजन बॉम्बच्या परीक्षणाचा हा व्हिडिओ, भारत आणि अमेरिकेसोबत त्याचा तणावर शिगेला पोहोचलेला असतानाच पोस्ट केला आहे.
News English Summary: China is now directly threatening India with a hydrogen bomb. The Global Times, China’s official newspaper that pretends to be world peace, has posted a video of a 1967 hydrogen bomb test. At the same time, it is said that the hydrogen bomb is for self-defense and that our country will not use nuclear weapons in the first place.
News English Title: China shows fear of hydrogen bomb to India after nefarious act in Galwan vall News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News