22 April 2025 9:36 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांच्या HRA मध्ये बदल होणार, हिशेबही नवीन बेसिक प्रमाणे, अपडेट जाणून घ्या EPFO Pension News | खाजगी कंपनी पगारदारांसाठी मोठी बातमी, EPFO ची महिना 7500 रुपये मिनिमम पेन्शन मिळणार SBI Mutual Fund | पगारदारांनो, बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 1 लाखांच्या गुंतवणुकीवर 1.27 कोटी परतावा मिळेल Horoscope Today | 22 एप्रिल 2025, तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस कसा असेल? तुमचे मंगळवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या HFCL Share Price | रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी असलेल्या स्वस्त शेअर्सची जोरदार खरेदी, 5 दिवसात 12.59% तेजी - NSE: HFCL Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार मंगळवार 22 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

कोरोना रुग्णांवर ‘हायड्रोक्सिक्लोरोक्वीन’ या औषधाच्या ट्रायलवर WHO'कडून बंदी

World health organization, WHO, hydroxychloroquine medicine, Covid 19

जिनिव्हा, १९ जून : देशात एकीकडे कोरोनाबधितांचा आकडा वाढत असताना अद्याप लस किंवा औषध मिळालेले नाही. अशातच सध्या सर्वच देश कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी वापरत असलेल्या ‘हायड्रोक्सिक्लोरोक्वीन’ या औषधाच्या ट्रायलवर जागतिक आरोग्य संघटनेने बंदी घातली आहे. सॉलिडॅरिटी ट्रायलवर ही बंदी घालण्यात आली आहे. ब्रिटनमधील रिकव्हरी ट्रायल आणि अन्य पुरावे लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, सॉलिडॅरिटी ट्रायल आणि ब्रिटनमधील रिकव्हरी ट्रायल यांच्यात हायड्रोक्सिक्लोरोक्वीन औषधामुळे कोरोनाचा मृत्यूदर कमी झालेला आढळून आला नाही. त्यामुळे या औषधाचा ट्रायल थांबविण्यात आला आहे. दरम्यान ज्या रुग्णावर आधीच या औषधाचा कोर्स सुरू आहे. त्यांना हे औषध वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे.

दरम्यान, भारतातील कोरोना विळखा दिवसेंदिवस अधिक घट्ट होत आहे. मागील २४ तासांत देशात तब्बल 12 हजार 881 नवीन रुग्ण आढळले असून 334 जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 3 लाख 66 हजार 946वर पोहोचली असून आतापर्यंत 12 हजार 237 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, देशात सध्या 1 लाख 60 हजार 384 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, तर 1 लाख 94 हजार 324 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

 

News English Summary: According to the World Health Organization, between the solidarity trial and the recovery trial in the UK, the drug hydroxychloroquine was not found to reduce corona mortality. Therefore, the trial of this drug has been stopped. Meanwhile a patient who is already undergoing a course of this drug. They are allowed to use this drug.

News English Title: World health organization bans hydroxychloroquine medicine trials on Covid 19 Patients News latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या