22 November 2024 4:36 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

त्या करारामुळे जवानांनी लडाखमध्ये शस्त्रांचा वापर केला नाही - केंद्राचं उत्तर

Union Foreign Minister S Jaishankar, Rahul Gandhi, Chinese troops in the Galwan Valley

नवी दिल्ली, १८ जून : पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांसोबत झालेल्या चकमकीत २० भारतीय जवान शहीद झाल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारला अनेक प्रश्न विचारले आहेत. आपल्या जवानांना विनाशस्त्र शहीद होण्यासाठी का पाठवले होते ? अशी विचारणाही त्यांनी केली आहे. राहुल गांधी यांच्या प्रश्नाचं उत्तर केंद्रीय परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी दिलं आहे.

राहुल गांधींनी केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर देताना एस. जयशंकर म्हणाले की, आपल्याला वास्तव समजून घेतले पाहिजे. सीमेवर कर्तव्य बजावत असलेला प्रत्येक जवान शस्त्रसज्ज असतो. आपली चौकी सोडत असताना सर्व जवान आपली शस्त्रे सोबत घेतात. १५ जून रोजी गलवान खोऱ्यात तैनात असलेल्या सैनिकांजवळसुद्धा शस्त्रे होती. चिनी सैनिकांशी हिंसक झटापट झाली, तेव्हा हत्यारांचा वापर न करण्याबाबतचा आदेश स्पष्ट होता. सीमेवर झालेल्या तणावावेळी हत्यारांचा वापर करायचा नाही हा नियम भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये दीर्घकाळापासून चालत आला आहे. १९९६ आणि २००५ मधील करारांनुसार ही परंपरा पाळली जात आहे, असे जयशंकर यांनी स्पष्ट केले.

राहुल गांधी यांनी एक व्हिडीओ शेअर करत चीनची आपल्या विनाशस्त्र जवानांची हत्या करण्याची हिंमत कशी झाली ? तसंच आपल्या जवानांना विनाशस्त्र शहीद होण्यासाठी का पाठवले होते ? असे सवाल विचारले होते.

 

News English Summary: Congress leader Rahul Gandhi has asked a number of questions to the Modi government after 20 Indian soldiers were killed in a clash with Chinese troops in the Galwan Valley in eastern Ladakh. Why were your soldiers sent unarmed to be martyred? He has also asked such a question. Union Foreign Minister S Jaishankar has answered Rahul Gandhi’s question.

News English Title: Union Foreign Minister S Jaishankar has answered Rahul Gandhi question soldiers were killed in a clash with Chinese troops in the Galwan Valley in eastern Ladakh News Latest Updates.

हॅशटॅग्स

#China(26)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x