22 November 2024 4:47 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम Smart Investment | शेअर बाजारातील गुंतवणूक समजत नाही; चिंता नको, गुंतवणुकीचे 'हे' पर्याय देतात बक्कळ पैसे - Marathi News Aadhar ATM Facility | ATM मध्ये न जाता पैसे कसे काढायचे ठाऊक आहे का; पहा आधार ATM ची कमाल, घरबसल्या मिळतील पैसे Tata Power Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAPOWER Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
x

उद्धव ठाकरेंकडे आम्ही उद्याचे देशाचे पंतप्रधान म्हणून पाहतोय - खा. संजय राऊत

MP Sanjay Raut, CM Uddhav Thackeray, Prime Minister

मुंबई, १९ जून : शिवसेनेचा आज ५४वा वर्धापन दिन आहे. दरवर्षी अफाट उत्साहात आणि थाटात साजरा होणारा हा वर्धापन दिन आज कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर अतिशय साध्या पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आज दुपारी साडेबारा वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून शिवसेना नेते, उपनेते, जिल्हाप्रमुख आणि अन्य पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिकांशी संवाद साधला.

१९ जून १९६६ रोजी शिवसेनेची स्थापना झाली होती. गेल्या साडेपाच दशकांमध्ये शिवसेनेने एक प्रादेशिक पक्ष म्हणून राजकारणात ठसा उमटवला आहे. महाराष्ट्रातील एक प्रमुख प्रादेशिक पक्ष म्हणून शिवसेनेची ओळख आहेच परंतु आता राज्यात मुख्यमंत्रीही शिवसेनेचे असल्यामुळे पक्षाला एक वेगळे स्थान मिळाले आहे.

दरम्यान, संजय राऊत यांनी देखील मोठं विधान केलं आहे. उद्धव ठाकरेंकडे आम्ही तुमच्याकडे उद्याचे देशाचे पंतप्रधान म्हणून पाहतोय. आता राज्याच्या सीमा ओलांडण्याची वेळ आली आहे. आता देशाचं नेतृत्व करण्याची वेळ आली आहे, असं वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलं आहे. शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात संजय राऊत बोलत होते. पक्षाचा विचार आणि सरकार एकत्र चाललं पाहिजे. सत्तेवर असल्याचं भान ठेवून काम करावं लागेल, असंही राऊत म्हणाले.

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असल्यानेच कोरोना संकटावर मात करू शकतोय. पूर्ण सत्ता जेव्हा शिवसेनेची येईल, सेनेचे १८० आमदार येतील, तेव्हाच तुम्ही मुख्यमंत्री व्हाल, तेव्हाच स्वप्न पूर्ण होईल, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं.

 

News English Summary: MP Sanjay Raut has also made a big statement. We see Uddhav Thackeray as the Prime Minister of tomorrow. Now it’s time to cross the state border. Now is the time to lead the country, said Shiv Sena leader Sanjay Raut.

News English Title: We see Uddhav Thackeray as the Prime Minister of tomorrow News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x