चिनी सैनिकांनी पेंगाँग त्सो जवळ ८ किलोमीटर भागावर कब्जा केला? सविस्तर वृत्त
नवी दिल्ली, २१ जून : पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्याचे चित्र अद्याप स्पष्ट नाही. मात्र, एक गोष्ट निश्चित, की चिनी सैनिकांनी पेंगाँग त्सो जवळ 8 किलोमीटर भागावर कब्जा केला आहे. मेच्या सुरुवातीला येथे पाऊल ठेवलेल्या चीनने डिफेन्स स्ट्रक्चर्स आणि बंकर्सदेखील तयार केले आहेत. सरोवराच्या उत्तरेकडील काठावर फिंगर 4 ते 8 दरम्यानच्या ऊंच भागांवर पिपल्स लिब्रेशन आर्मीच्या (PLA) सैनिकांनी कब्बजा केला आहे. गलवान घाटी आणि हॉट स्प्रिंग्ससंदर्भात भारत चीन दरम्यान बोलने होत असतानाच, चीनने येथे आपल्या हालचाली वाढवल्याचे समजते.
आधिकृत सूत्रांच्या हवाल्याने नवभारत टाइम्सने म्हटले आहे, की गलवान खोऱ्यात पेट्रोल पॉइंट 14 जवळील भागांत भारतीय लष्कर धैर्याने उभे आहे. येथेच 15-16 जूनच्या रात्री दोन्ही देशांदरम्यान हिंसक झटापट झाली होती. या घटनेनंतर लष्कराने म्हटले होते, की दोन्ही देशांचे सैन्य तेथून मागे हटले आहेत. “गलवानमध्ये दोन्ही देशांचे सैन्य आपापल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या (LAC) आत आहे. मात्र, दोन्हीकडेही लष्कराची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच लष्कर पूर्णपणे मागे हटलेले नाही.”
दरम्यान, समोरासमोर उभ्या ठाकलेल्या उभय बाजूच्या सैनिकांमध्ये कोणत्याही क्षणी ठिणगी पडून या भागातील स्थिती आणखी खालावण्याची शक्यता आहे. गलवान खोऱ्यातील सैनिकांचे मृत्यू ही भारत-चीन सीमेवर गेल्या ४५ वर्षांत झालेली पहिलीच घटना आहे. या दोन्ही अण्वस्त्रधारी देशांनी १९९३ मध्ये केलेल्या करारानुसार या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर अशा घटनांत अग्निशस्त्रांचा वापर न करण्याचे ठरले आहे. गलवान खोऱ्यातील घटनेमुळे या कराराबाबत मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्याचप्रमाणे लडाखमध्ये उभय बाजूच्या सैनिकांच्या माघारीच्या प्रक्रियेलाही मोठी खीळ बसली आहे.
याबाबत माजी लष्करप्रमुख व्ही. पी. मलिक यांनी सांगितले की, ‘‘जर सैन्यमाघारीची प्रक्रिया जलद गतीने पार पडली नाही, तर गलवानमधील घटनांची पुनरावृत्ती होण्याची शक्यता जास्त आहे. समोरासमोर उभे ठाकलेल्या सैनिकांमध्ये तणाव, संतापाची भावना अधिक असते. एखादी लहानशी घटनाही संघर्षांची ठिणगी टाकण्यासाठी पुरेशी ठरू शकते.’’
News English Summary: The picture of the Galvan Valley in eastern Ladakh is not yet clear. One thing is for sure, however, that Chinese troops have captured an area of 8 kilometers near Pengang Tso. China, which set foot here in early May, has also built defense structures and bunkers. People’s Liberation Army (PLA) troops occupy the elevated areas between Finger 4 and 8 on the northern shore of the lake.
News English Title: India China face China soldiers occupying 8 KM stretch Pangong TSO ladakh News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, पुन्हा मोठी कमाई होणार - NSE: TATAMOTORS