21 November 2024 11:51 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

भारत आणि चीनशी चर्चा करत आहोत, परिस्थिती अत्यंत कठीण आहे - डोनाल्ड ट्रम्प

India China, Ladakh, US President Donald Trump

वॉशिंग्टन, २१ जून : गलवान खोऱ्यात भारतीय आणि चिनी सैनिकांमधील हिंसक चकमकीनंतर दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला आहे. दोन्ही देशांमधील घडामोडींवर अमेरिकेचे लक्ष आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, ‘भारत आणि चीनशी चर्चा करत आहोत. परिस्थिती अत्यंत कठीण आहे.’

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी म्हटलं की, ‘ही एक अतिशय कठीण परिस्थिती आहे. आम्ही भारत आणि चीन या दोघांशी बोलत आहोत. त्यांच्यात मोठी समस्या निर्माण झाली आहे. काय करता येईल ते पाहू. आम्ही मदत करण्याचा प्रयत्न करु.’

याआधी ट्रम्प यांनी काही महिन्यांपूर्वी भारत-चीन सीमा वादावर मध्यस्थी करण्याबाबत वक्तव्य केलं होतं. ट्रम्प यांनी म्हटले होते की भारत आणि चीनमधील सीमा विवादांच्या मुद्यावर अमेरिका मध्यस्थी करण्यास तयार आहे. पण त्यांची ही मध्यस्थती दोन्ही देशांनी फेटाळून लावली.

तत्पूर्वी, “चिनी सैन्य जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारतासोबत तणाव निर्माण करण्यात गुंतलं आहे. दक्षिण चीन समुद्रात चीन आपल्या क्षेत्राचा अवैधरित्या विस्तार करत आहे,” असं अमेरिकेचे पररराष्ट्र मंत्री पॉम्पियो म्हणाले होते. “करोना व्हायरसबद्दलंही चीन खोटं बोलला. तसंच त्यांनी हा व्हायरस जगातील सर्व ठिकाणी पसरू दिला. तसंच आपला हा कट लपवण्यासाठी चीननं जागतिक आरोग्य संघटनेवर दबाव आणला,” असा आरोपही त्यांनी यावेळी केला. शुक्रवारी त्यांनी ‘कोपेनहेगन डेमोक्रेसी समिट २०२०’ मध्ये ‘युरोप आणि चीनची आव्हानं’ या विषयावर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित केलं होतं आणि त्यावेळी ते बोलत होते.

 

News English Summary: Tensions have risen in both countries following violent clashes between Indian and Chinese troops in the Galvan Valley. The United States is keeping an eye on developments in both countries. US President Donald Trump said, “We are in talks with India and China. The situation is very difficult.

News English Title: We are in talks with India and China and The situation is very difficult said US President Donald Trump News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Donald Trump(89)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x