22 November 2024 5:50 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

चीनच्या घुसखोरीसंदर्भात खोटं बोलून नरेंद्र मोदी देशवासियांची फसवणूक करतायंत - प्रकाश आंबेडकर

Prime Minister Narendra Modi, Prakash Ambedkar, India China Issue

मुंबई, २१ जून : लडाखच्या सीमारेषेवरील गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या सैन्यात झालेल्या झटापटीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. तसेच, चीन सैन्य भारतीय हद्दीत घुसलेच नव्हते, तर मारहाण होऊन जवान शहीद झालेच कसे ? असा प्रश्नही आंबेडकर यांनी विचारला आहे. यावरुन पंतप्रधान मोदी नागरिकांची फसवणूक करत असल्याचेही त्यांनी म्हटले.

मोदींच्या वक्तव्यानंतर काँग्रेसने मोदींवर प्रश्नांचा भडीमार केल्याचं पाहायला मिळालं. आता वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनीही मोदींना लक्ष्य केले. लडाख सीमारेषेवरील घुसकोरीसंदर्भात मोदींनी जनतेशी फसवणूक करत खोटे बोलल्याचा आरोप आंबेडकर यांनी केला आहे. दरम्यान यापूर्वी, पंतप्रधान मोदींनी गलवान खोऱ्याचा प्रदेश चीनच्या ताब्यात जाऊन दिला. जर हा भूभाग चीनचाच होता तर मग आपले सैनिक कसे मारले गेले? आपले सैनिक नक्की कोणत्या जागी शहीद झाले, असे अनेक सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित केले होते.

आधिकृत सूत्रांच्या हवाल्याने नवभारत टाइम्सने म्हटले आहे, की गलवान खोऱ्यात पेट्रोल पॉइंट 14 जवळील भागांत भारतीय लष्कर धैर्याने उभे आहे. येथेच 15-16 जूनच्या रात्री दोन्ही देशांदरम्यान हिंसक झटापट झाली होती. या घटनेनंतर लष्कराने म्हटले होते, की दोन्ही देशांचे सैन्य तेथून मागे हटले आहेत. “गलवानमध्ये दोन्ही देशांचे सैन्य आपापल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या (LAC) आत आहे. मात्र, दोन्हीकडेही लष्कराची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच लष्कर पूर्णपणे मागे हटलेले नाही.”

दरम्यान, गलवान खोऱ्यातील भारत-चीन संघर्षांच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या सर्वपक्षीय बैठकीनंतरही काँग्रेसने केंद्र सरकारवर प्रश्नांची सरबत्ती केली आहे. भारताच्या हद्दीत कोणीही घुसखोरी केली नाही, असे घोषित करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनला निर्दोष ठरवले आहे का, असा सवाल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केला.

 

News English Summary: Prakash Ambedkar, the leader of the Deprived Bahujan Alliance (BBA), has accused Prime Minister Narendra Modi of lying about the clash between Indian and Chinese forces in the Galvan Valley on the border with Ladakh. Also, how did the Chinese army not only infiltrate the Indian border, but also be beaten and martyred? Ambedkar has also asked such a question. He also said that Prime Minister Modi was cheating the citizens.

News English Title: Prime Minister Narendra Modi is deceiving the people by lying about Chinese infiltration Prakash Ambedkar News latest Updates.

हॅशटॅग्स

#Prakash Ambedkar(119)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x