22 November 2024 12:31 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON
x

२४ तासांत १५,४१३ नवे रुग्ण, देशातील कोरोनाबाधितांचा आकडा ४ लाख १० हजार ४६१वर

Corona Virus, Covid 19, India

नवी दिल्ली, २१ जून : जगभरात थैमान घालणाऱ्या जीवघेण्या कोरोना व्हायरसने भारतात ४ लाख रुग्णांचा टप्पा ओलांडला आहे. मागील २४ तासांत देशात आतापर्यंतचे सर्वाधिक तब्बल १५ हजार ४१३ नवे करोनाबाधित आढळले, तर ३०६ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे आता देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ४ लाख १० हजार ४६१वर पोहोचली असून आतापर्यंत १३ हजार २५४ जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे.

दरम्यान, देशात सध्या १ लाख ६९ हजार ४५१ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत, तर २ लाख २७ हजार ७५६ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे.

गेल्या २४ तासांत देशभरात १३९२५ कोरोनाचे रुग्ण बरे झाले आहेत. तर १६९४५१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आयसीएमआरच्या म्हणण्यानुसार, देशात आतापर्यंत ६८,०७,२२६ जणांची कोरोना टेस्ट करण्यात आली आहे. एका दिवसात म्हणेजच गेल्या २४ तासांत १९०७३० सॅम्पल टेस्ट करण्यात आल्या आहेत.

देशात सलग नवव्या दिवशी १० हजाराहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. १ जून ते २० जून दरम्यान देशभरात कोरोना विषाणूच्या संसर्गाची दोन लाखांहून अधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत. महाराष्ट्र, तामिळनाडू, दिल्ली, गुजरात आणि उत्तर प्रदेश ही देशातील पहिल्या पाच राज्यांपैकी एक आहे, ज्यात कोविड -१९ च्या घटनांमध्ये सर्वाधिक वाढ झाली आहे.

 

News English Summary: The world’s deadliest corona virus has crossed the 4 million mark in India. In the last 24 hours, 15,413 new corona cases were found in the country, while 306 corona patients died.

News English Title: The corona virus has crossed the 4 million mark in India News latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x