22 November 2024 5:19 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम Smart Investment | शेअर बाजारातील गुंतवणूक समजत नाही; चिंता नको, गुंतवणुकीचे 'हे' पर्याय देतात बक्कळ पैसे - Marathi News Aadhar ATM Facility | ATM मध्ये न जाता पैसे कसे काढायचे ठाऊक आहे का; पहा आधार ATM ची कमाल, घरबसल्या मिळतील पैसे Tata Power Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAPOWER
x

मुंबईतील S वॉर्डमधील भांडूप, विक्रोळी, कांजूरमार्ग व पवई परिसरात कोरोना रूग्ण संख्या वाढतेय

BMC S Ward, corona patients

मुंबई, २१ जून : जगभरात थैमान घालणाऱ्या जीवघेण्या कोरोना व्हायरसने भारतात ४ लाख रुग्णांचा टप्पा ओलांडला आहे. मागील २४ तासांत देशात आतापर्यंतचे सर्वाधिक तब्बल १५ हजार ४१३ नवे करोनाबाधित आढळले, तर ३०६ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे आता देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ४ लाख १० हजार ४६१वर पोहोचली असून आतापर्यंत १३ हजार २५४ जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे.

दरम्यान, देशात सध्या १ लाख ६९ हजार ४५१ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत, तर २ लाख २७ हजार ७५६ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे.

दुसरीकडे मुंबईतही कोरोनाचे रूग्ण वाढत चालले आहे. चार वेळा वेगवेगळ्या टप्प्यात लॉकडाऊन करूनही रूग्ण संख्या आटोक्यात येत नाही. असं असताना मुंबईतील ‘एस वॉर्ड’ कोविड-१९ च्या टॉप १० यादीत समाविष्ट झाला आहे. ‘एस वॉर्ड’ म्हणजे मुंबईतील भांडूप, विक्रोळी, कांजूरमार्ग आणि पवई परिसरात कोरोनाच्या रूग्णांची वाढ होत आहे. असं असताना एस वॉर्ड कोरोनाच्या यादीत आहे.

एप्रिल महिन्याच्या सुरूवातीला एस वॉर्ड सर्वाधिक कमी रूग्ण असणाऱ्या यादीत होता. पण जून महिन्यात या वॉर्डमध्ये झपाट्याने रूग्णसंख्या वाढली आहे. १ जूनला एस वॉर्डमध्ये १७०५ कोरोनाग्रस्त होते तर १६ जूनला अवघ्या पंधरवड्यात रूग्णांची वाढ झपाट्याने झाली आणि हा आकडा ३१६६ वर पोहोचली.

धक्कादायक बाब म्हणजे गेल्या आठवड्यात एस वॉर्डमध्ये जवळपास ६०० कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण सापडले. तुलना केल्यावर मुंबईतील यादीत याचा आठवा क्रमांक लागतो. या वॉर्डमधील सर्वाधिक कोरोना रूग्ण हे झोपडपट्टी भागातील असले तरही पवईतील उच्चभ्रू वस्तीतही कोरोनाचे रूग्ण आढळले आहेत. कांजुरमार्ग आणि भांडूप परिसरातील झोपडपट्टी भागात रूग्णांची संख्या वाढत होती. फुले नगर, तान्हाजी वाडी, सोनापूर, टेंभीपाडा, गावदेवी या भांडूप पश्चिमेकडील भागात रूग्ण वाढत होते. तर विक्रोळीत आंबेडकर चौक जो कन्नमवार नगरचा भाग आहे तिथे रूग्ण वाढत होते.

 

News English Summary: Mumbai’s ‘S Ward’ has been included in the top 10 list of Covid-19. ‘S Ward’ means corona patients are increasing in Bhandup, Vikhroli, Kanjurmarg and Powai areas of Mumbai. As such, S Ward is on Corona’s list.

News English Title: BMC S Ward means corona patients are increasing in Bhandup Vikhroli Kanjurmarg and Powai areas of Mumbai News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x