22 November 2024 6:12 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम Smart Investment | शेअर बाजारातील गुंतवणूक समजत नाही; चिंता नको, गुंतवणुकीचे 'हे' पर्याय देतात बक्कळ पैसे - Marathi News Aadhar ATM Facility | ATM मध्ये न जाता पैसे कसे काढायचे ठाऊक आहे का; पहा आधार ATM ची कमाल, घरबसल्या मिळतील पैसे Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअरमध्ये पुन्हा तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER
x

८१ देशांमध्ये कोरोना पुन्हा धुमाकूळ घालणार, WHO ने दिला इशारा

WHO, World Health Organization, Covid 19, Corona Virus

जिनिव्हा, २१ जून : कोरोना व्हायरसचा धोका कमी झाला, असं कोणाला वाटत असल्यास हा चुकीचा समज आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) कोरोना संसर्गाच्या ‘नवीन आणि धोकादायक’ अवस्थेचा इशारा दिला आहे. WHOचे प्रमुख Tedros Adhanom Ghebreyesus यांनी शुक्रवारी सांगितलं की, जग कोरोना संसर्गाच्या नवीन आणि धोकादायक टप्प्यात आहे. अनेक लोक घरांत बंद राहून कंटाळले आहेत, परंतु परिस्थिती अद्यापही सुधारली नाही. कोरोना व्हायरस अजूनही वेगात पसरत आहे. अमेरिकेसह दक्षिण आणि पश्चिम आशियामध्ये मोठ्या प्रमाणात नवीन रुग्ण आढळत असून ही मोठी चिंताजनक बाब आहे.

भारतासह जगभरात कोरोनाचा प्रकोप सुरुच आहे. अमेरिका आणि ब्राझिल या देशांमध्ये सर्वाधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. या दोन्ही देशांच्या राष्ट्रपतींनी सुरुवातीच्या काळात कोरोना संसर्गाला तितकंस महत्त्व न देता, कडक उपाययोजना करण्याबाबत विरोध केला होता. आज या दोन्ही देशांची स्थिती सर्वांसमोर आहे. ब्राझिलमध्ये कोरोना संसर्गग्रस्तांची संख्या १० लाखांवर पोहचली आहे.

ब्राझीलमध्ये शनिवारी कोरोनाग्रस्तांची संख्या दहा लाखांपेक्षा अधिक झाल्याचे सरकारने जाहीर केले. आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, गुरुवारपासून आतापर्यंत बाधितांची एकूण संख्या १० लाख ३२ हजार ९१३ इतकी झाली आहे. कोरोनाबाधितांच्या यादीत अमेरिकेपाठोपाठ ब्राझील दुसऱ्या स्थानावर आहे. तज्ज्ञांच्या मते, ब्राझीलमध्ये कोरोनाबाधितांची खरी संख्या सरकारच्या अधिकृत आकडेवारीपेक्षा सात पट जास्त असू शकते. देशातील संशयितांवरील चाचण्यांचा वेग वाढविणे गरजेचे असल्याचेही तज्ज्ञांनी म्हटले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेनुसार दक्षिण आशिया, मध्य पूर्व आशिया आणि आफ्रिकन देशांमध्ये परिस्थिती चिंताजनक होणार आहे. अफ्रिकन देशांमध्ये बाधितांचा आकडा लाखावर पोहोचण्यासाठी तीन महिने लागले होते, मात्र आता गेल्या १९ दिवसांत बाधितांचा आकडा दुप्पटीने वाढत आहे. दक्षिण आफ्रिकेत दररोज एक हजारांहून अधिक करोनाबाधित आढळत असल्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. ३६ देशांमध्ये करोनाबाधितांच्या संख्येत घट झाली असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. जगभरातील करोनाबाधितांची संख्या ८९ लाखांहून अधिक झाली आहे. त्यापैकी ४ लाख ६७ हजार जणांचा मृत्यू झाला आहे. तर, ४७ लाखांहून अधिकजणांनी करोनावर यशस्वी मात केली असल्याचे ‘वर्ल्डोमीटर’ या संकेतस्थळाने नमूद केले आहे.

 

News English Summary: This is a misconception if anyone thinks that the risk of corona virus has decreased. The World Health Organization (WHO) has warned of a ‘new and dangerous’ stage of corona infection. WHO’s chief Tedros Adhanom Ghebreyesus said on Friday that the world is a new and dangerous phase of infection, Corona.

News English Title: The World Health Organization has warned of a new and dangerous stage of corona infection News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x