16 February 2025 8:48 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Coal India Share Price | मल्टिबॅगर पीएसयू शेअर मालामाल करणार, रॉकेट तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: COALINDIA BPCL Share Price | BPCL कंपनी शेअरबाबत तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BPCL SBI Share Price | एसबीआय FD विसरा, SBI बँकेचा शेअर मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: SBIN Vikas Ecotech Share Price | 2 रुपये 58 पैशाचा शेअर फोकसमध्ये, यापूर्वी मजबूत परतावा दिला, स्टॉक BUY करावा का - NSE: VIKASECO Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअरबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, फायद्याचे संकेत - NSE: IDEA SJVN Share Price | PSU शेअरमधील घसरण थांबेना, 6 महिन्यात 37% घसरला, पुढे काय होणार - NSE: SJVN Mumbai Police | 4500 कोटींची उलाढाल, मुंबई पोलिसांच्या पतसंस्थेत पॅनल्सची निवडणूक मोर्चेबांधणी, सर्व्हेमध्ये उमंग पॅनेल सरस
x

आपल्या सरकारच्या कृती व निर्णयावरून भविष्यातील पिढी आपल्याला ओळखणार - डॉ. मनमोहन सिंग

Former Prime Minister Dr Manmohan Singh, PM Narendra Modi, India China, Ladakh

नवी दिल्ली, २२ जून : भारत-चीन हिंसक चकमकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवली होती. या बैठकीत पंतप्रधान मोदींनी, “भारतीय सीमेत कोणीही घुसखोरी केलेली नाही,” असं विधान केलं होतं. या विधानावरुन गोंधळ निर्माण झाला होता. त्यानंतर स्पष्टीकरण द्यायची वेळी सुद्धा पंतप्रधान कार्यालयावर आली होती. नेमकं सीमेवर काय झालं या बाबत नेमकी माहिती कोणाला माहिती नाही आहे. या पार्श्वभूमीवर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पत्र लिहिलं आहे. या पत्रात पंतप्रधानांनी सुरक्षा, सामरिक मुद्द्यांवर जपून बोललं पाहिजे, असा सल्ला दिला आहे. कुठलाही भ्रामक प्रचार सक्षम नेतृत्वाला पर्याय ठरत नाही, असं देखीन मनमोहन सिंग यांनी म्हटलं आहे.

आपला देश आज इतिहासाच्या नाजूक टप्प्यावर उभा आहे. आपल्या सरकारने आज घेतलेले निर्णय आणि पावले भावी पिढ्या आपले आकलन कशाप्रकारे करतील, हे निश्चित करतील. देशाच्या नेतृत्त्व करणाऱ्यांच्या खांद्यावर कर्तव्य पार पाडण्याची मोठी जबाबदारी आहे. आपल्यासारख्या लोकशाही देशात या सगळ्यासाठी पंतप्रधान उत्तरदायी असतात. त्यामुळे आपली वक्तव्य किंवा घोषणांमुळे देशाच्या सामरिक किंवा भूप्रदेशीय हितसंबंधांवर पडणाऱ्या प्रभावाविषयी पंतप्रधानांनी अत्यंत सजग राहिले पाहिजे, असे मनमोहन सिंग यांनी पत्रात म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या शब्दांचा वापर चीनला आपली बाजू भक्कमपणे मांडण्यासाठी करु देऊ शकत नाही असं यावेळी त्यांनी सांगितलं आहे. यावेळी संपूर्ण देशाने एकत्र येऊन चीनला उत्तर देण्याची गरज असल्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्व लडाखमध्ये भारतीय हद्दीत कोणीही घुसखोरी केलेली नाही आणि लष्करी तळही ताब्यात घेतलेले नाहीत, असं विधान सर्वपक्षीय बैठकीत केल्यानंतर विरोधक आक्रमक झाले असून टीका करत आहेत.

 

News English Summary: Former Prime Minister Manmohan Singh has written the letter. In the letter, the Prime Minister advised that security and strategic issues should be taken into consideration. Manmohan Singh has said that no misleading propaganda is an alternative to competent leadership.

News English Title: Former Prime Minister Manmohan Singh has written the letter PM Narendra Modi News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Manmohan Singh(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x