22 November 2024 12:11 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839
x

परप्रांतीय मजूर परतत आहेत, रोहित पवारांचं मराठी तरुणांना मनसे आवाहन

Migrants Laborers, Pune, MLA Rohit Pawar

पुणे, २४ जून : लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर पुण्यात १४४ रेल्वेगाड्यातून ३० हजार मजूर पुण्यात परतले आहेत. 22 हजार थेट पुणे रेल्वे स्टेशनवर तर 8963 जण लोणी, दौंड, उरुळी कांचन अशा स्थानकांवर उतरले आहेत. लॉकडाउनच्या काळात 139 रेल्वे गाड्यातून 1 लाख 80 हजार मजूर मुळगावी गेले होते. पण, आता पुण्यात मोठ्या संख्येनं मजूर परत येत आहे. पुणे -पटणा, मुंबई- बंगलोर, भोपाळ-गोवा, मुंबई-भुवनेश्वर, मुंबई-हैदराबाद, मुंबई-गदग या गाड्या जेव्हा परत फिरतात तेव्हा या गाड्यातून साधारण २००० प्रवासी रोज परत येत आहे, अशी माहिती माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.

लॉकडाउनच्या काळात परप्रांतीय मजूर आपल्या गावी परतले होते. पण, आता अटी शिथिल झाल्यामुळे हे मजूर पुन्हा एकदा पुण्याकडे निघाले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी ‘आपल्या हक्काची कामं जाऊ शकतात, मराठी तरुणांनी तातडीने कंपन्यांत जॉईन होण्याचा विचार कराव्या’ असं आवाहन केलं आहे.

लॉकडाउन 5 च्या टप्प्यात अटी शिथिल केल्यामुळे परप्रांतीय मजूर पुन्हा एकदा मुंबई, पुण्यात परतत आहे. याच मुद्यावरून रोहित पवार यांनी ट्वीट करून मराठी तरुणांना आवाहन केलं आहे. ‘पुण्यासारख्या शहरात रोज 17 हजारांपेक्षाही अधिक स्थलांतरित मजूर परतत आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसात आपली हक्काची कामं जाऊ शकतात’ अशी भीती रोहित पवारांनी व्यक्त केली.

‘मराठी तरुणांनी तातडीने कंपन्यांत जॉईन होण्याचा विचार करावा. अनेकांनी चांगला प्रतिसाद दिला, पण अजून देण्याची गरज आहे. कोणतंही काम लहान-मोठं नसतं’ असंही रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

 

News English Summary: Rohit Pawar has appealed to Marathi youth by tweeting. In a city like Pune, more than 17,000 migrant workers are returning every day. Therefore, in the next few days, we can go to work for our rights, ‘ feared MLA Rohit Pawar.

News English Title: NCP MLA Rohit Pawar has appealed to Marathi youth by tweeting News Latest Updates.

हॅशटॅग्स

#RohitPawar(75)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x