19 April 2025 7:40 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | पती-पत्नीसाठी खास सरकारी योजना, वर्षाला 1,11,000 रुपये तर महिन्याला 9250 रुपये व्याज मिळेल SBI Gold ETF | तुम्ही सोन्यात गुंतवणूक करताय? पण पैसा 'गोल्ड फंडात' झपाट्याने वाढतोय, प्रचंड फायद्याची अपडेट PPF Investment | पगारदारांनो, या सरकारी योजनेत वर्षाला 1.5 लाख रुपयांच्या बचत करा, तब्बल 1.5 कोटी रुपये परतावा मिळेल Horoscope Today | 19 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Infosys Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेल्या IT स्टॉकसाठी BUY रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: INFY IRFC Share Price | 129 रुपयाच्या शेअरसाठी 165 रुपये टार्गेट प्राईस, महत्वाची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC Reliance Share Price | कोटक सिक्युरिटीज बुलिश, जाहीर केली टार्गेट प्राईस, गुंतवणूकदारांसाठी अपडेट - NSE: RELIANCE
x

तृणमूल काँग्रेसचे आमदार तमोनाश घोष यांचं कोरोनामुळे निधन

TMC MLA Tamonash Ghosh, died due to Corona virus, Mamata Banerjee

कोलकाता, २४ जून : देशात कोरोना व्हायरसनं थैमान घातलं असतानाच आता धक्कादायक घटना समोर आली आहे. पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेस आमदार तमोनाश घोष यांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. वयाच्या ६० व्या वर्षी रुग्णालयात कोविड-19 च्या उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. तमोनाश घोष यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानं त्यांच्यावर उपचार सुरू होते.

तमोनाश घोष यांच्या निधनावर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शोक व्यक्त केला आहे. “खूप वाईट…तमोनाश घोष आज आपल्याला सोडून गेले. गेल्या ३५ वर्षांपासून ते आपल्यासोबत होते. पक्ष आणि लोकांसाठी ते समर्पित होते. सामाजिक कार्याच्या माध्यमातून त्यांनी खूप योगदान दिलं,” अशा भावना ममता बॅनर्जी यांनी ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केल्या आहेत.

याआधी 10 जून ला द्रमुकचे आमदार जे. अंबाजगन यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. जे. अंबाजगन हे 62 वर्षांचे होते. चैन्नईतील खासगी रुग्णलयात त्यांच्यावर उपचार सुरू असताना कोरोनामुळे मृत्यू झाला होता.

 

News English Summary: While the corona virus has spread in the country, a shocking incident has come to light. West Bengal Trinamool Congress MLA Tamonash Ghosh has reportedly died due to corona. At the age of 60, he breathed his last while undergoing treatment for Kovid-19 at the hospital.

News English Title: TMC MLA Tamonash Ghosh died due to Corona virus Mamata Banerjee pays tribute on twitter News latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या