22 November 2024 10:19 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS
x

देशात गेल्या २४ तासात कोरोनाचे १६,९२२ नवे रुग्ण, तर ४१८ रुग्णांचा मृत्यू

corona virus, Covid 29, India

नवी दिल्ली, २५ जून : देशात कोरोना रुग्णांची संख्या सतत वाढते आहे. गेल्या 24 तासातील नव्या कोरोनाबाधितांचा आकडा 17 हजारांच्या जवळपास गेला आहे. एका दिवसांतील हा सर्वाधिक आकडा आहे. गेल्या 24 तासात 418 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 4,73,105 इतकी झाली आहे.

गुरुवारी आरोग्य मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासात देशात 16,922 कोरोनाचे नवे रुग्ण सापडले आहेत. सध्या देशात 1,86,514 ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. तर आतापर्यंत 2,71,697 लोक कोरोनातून बरे झाले आहेत. देशात आतापर्यंत 14,894 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

दरम्यान, भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या कोरोनामुळे जगभरात आतापर्यत 485,122 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर तब्बल 95 लाख लोकांना त्याचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. कोरोना व्हायरसवर नियंत्रण मिळवण्यासाठी जगभरात संशोधन सुरू आहे. जगभरात कोरोनाने थैमान घातलेले असताना आणखी एक चिंताजनक माहिती समोर आली आहे.

येत्या ७ दिवसांत म्हणजेच पुढच्या आठवड्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा हा तब्बल १ कोटींवर पोहोचणार असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेनं दिली आहे. WHO ने हा गंभीर इशारा दिला आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेडरॉस अधनॉम यांनी पुढच्या आठवड्यात कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या एक कोटींवर पोहोचू शकते असं म्हटलं आहे.

 

News English Summary: The number of corona patients in the country is constantly increasing. The number of new coronaviruses in the last 24 hours has gone up to nearly 17,000. This is the highest number in a single day. 418 patients have died in the last 24 hours.

News English Title: The number of new corona viruses in the last 24 hours has gone up to nearly 17 000 News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x