19 April 2025 7:35 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | पती-पत्नीसाठी खास सरकारी योजना, वर्षाला 1,11,000 रुपये तर महिन्याला 9250 रुपये व्याज मिळेल SBI Gold ETF | तुम्ही सोन्यात गुंतवणूक करताय? पण पैसा 'गोल्ड फंडात' झपाट्याने वाढतोय, प्रचंड फायद्याची अपडेट PPF Investment | पगारदारांनो, या सरकारी योजनेत वर्षाला 1.5 लाख रुपयांच्या बचत करा, तब्बल 1.5 कोटी रुपये परतावा मिळेल Horoscope Today | 19 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Infosys Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेल्या IT स्टॉकसाठी BUY रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: INFY IRFC Share Price | 129 रुपयाच्या शेअरसाठी 165 रुपये टार्गेट प्राईस, महत्वाची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC Reliance Share Price | कोटक सिक्युरिटीज बुलिश, जाहीर केली टार्गेट प्राईस, गुंतवणूकदारांसाठी अपडेट - NSE: RELIANCE
x

नेपाळच्या पंतप्रधानांवर राजीनामा देण्यासाठी पक्षांतर्गत दबाव वाढला

Nepal Prime Minister KP Sharma Oli, India China, Ladakah

काठमांडू, २५ जून : भारत आणि चीनमध्ये निर्माण झालेल्या सीमासंघर्षावर आता कूटनीतीच्या माध्यमातून तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत. आज डब्ल्यूएमसीसीची एक महत्वपूर्ण बैठक होणार आहे. पूर्व लडाखमध्ये चार ठिकाणी संघर्षाची स्थिती आहे, त्यातून कसा तोडगा काढायचा या विषयी बैठकीत चर्चा होईल.

२२ जून रोजी भारत आणि चिनी लष्कराच्या अधिकाऱ्यांमध्ये वरिष्ठ पातळीवर चर्चा झाली. यामध्ये सैन्य मागे घेण्यासंदर्भात दोन्ही बाजूंमध्ये एकमत झाल्याचे अनौपचारिकरित्या सांगण्यात आले. पण त्या बैठकीत नेमकं काय ठरलंय ते अजून स्पष्ट झालेलं नाही. चीनच्या प्रवक्त्याने नेहमीप्रमाणे सीमेवर परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगितले. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिले आहे. लष्करी अधिकाऱ्यांमध्ये प्रत्येक वादाच्या मुद्दावर चर्चा झाल्यानंतर दोन्ही बाजूंनी तणाव कमी करायचे ठरवले आहे. दुसऱ्या बाजूला नेपाळ सरकार देखील चीनच्या सुरातसुर मिळवून भारतविरोधी निर्णय घेताना दिसत आहे. मात्र सध्या चीनने नेपाळला देखील दगा देत त्याचा भूभाग देखील गिळंकृत केल्याचं वृत्त आहे.

मात्र त्यानंतर नेपाळच्या सत्ताधारी पक्षात फूट पडल्याचं वृत्त आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्यास नकार दिला आहे. प्रचंड यांना पक्षातही मोठा पाठिंबा मिळत आहे. दोन माजी पंतप्रधान आणि पक्षाच्या अनेक खासदारांनी ओलीविरोधात जाहीर मोर्चा उघडला आहे. त्याचवेळी कोरोना व्हायरस संकाटातही ओली सरकारविरूद्ध नेपाळच्या लोकांमध्ये प्रचंड संताप दिसून येत आहे.

पक्षाच्या स्थायी समितीच्या बैठकीत दहल म्हणाले की, सरकार लोकांच्या अपेक्षांवर काम करण्यास अपयशी ठरले आहे. अध्यक्ष आणि पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी अदलाबदल करून सत्ता वाटपाच्या कराराचे उल्लंघन केल्याचा आरोपही त्यांनी केला. पक्षाच्या एकीकरणादरम्यान आम्ही अदलाबदल करुन सरकार चालवण्याचे मान्य केले होते, पण मी स्वतः माघार घेतली. सरकारचे काम पाहिल्यानंतर असे वाटते की असे करून मी चूक केली आहे.

 

News English Summary: There are reports of a split in Nepal’s ruling party. According to reports, Prime Minister KP Sharma Oli has refused to resign. Prachanda is also getting huge support in the party. Two former prime ministers and several party MPs have launched a public protest against Oli.

News English Title: Nepal Prime Minister KP Sharma Oli has refused to resign News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Nepal(10)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या